Autism Treatment  Dainik Gomantak
गोवा

Autism Treatment Center in Goa: ऑटिझम’ग्रस्तांसाठी ‘केअर सेंटर’ उभारा

भारत सरकारने 2021मध्ये ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षण अधिसूचित केले आहे. गोवा सरकारने त्याची अंमलबजावणी करावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: ‘ऑटिझम’ग्रस्त व्यक्तींसाठी एक ‘केअर सेंटर’ निर्माण करणे तसेच त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे काळाची गरज आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ बनविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

गोव्यात शुक्रवार, 6 ते रविवार, 8 रोजीपर्यंत तीन दिवसीय पर्पल फेस्ट-2023 च्या अनुषंगाने विरोधी पक्षनेत्यांनी एक निवेदन जारी केले आणि गोव्यातील दिव्यांग हक्क संघटनेला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

गोवा राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाने नेहमी जागरूक राहावे. आर्थिक फायद्यासाठी स्वार्थी लोकांना दिव्यांगांच्या योजनांचा फायदा घेण्यास देऊ नये, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.

अधिसूचनेचा अवलंब करावा

भारत सरकारने 2021मध्ये ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षण अधिसूचित केले आहे. आणि ऑटिझम व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या पदांच्या श्रेणी देखील जाहीर केल्या आहेत. गोवा सरकारने या अधिसूचनेचा अवलंब करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT