Robert Connolly At IFFI Press Conference
पणजी:ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नागरिक हे चित्रपटांवर प्रेम करणारे आहेत. दोन्ही देशांचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी चित्रपट महत्त्वाची भूमिका निभावतोय, असे मत ऑस्ट्रेलियन चित्रपट दिग्दर्शक रॉबर्ट कोनोली यांनी व्यक्त केले.
कोनोली म्हणाले, मी दिग्दर्शित केलेला ‘फोर्स ऑफ नेचर’ हा चित्रपट इफ्फीत दाखविण्यात आला. चित्रपट पाहिल्यानंतर मला अनेक चित्रपटप्रेमी भेटले. त्यांनी या चित्रपटाबाबात माझ्याशी साधकबाधक चर्चा केली.
भारतीय चित्रपट चाहत्यांचे प्रेम,अभिरूची पाहून मी अतिशय भारावलो. आज हवामानबदलाच्या समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. त्यामुळे त्याविषयी चित्रपटांमधून मोठ्या प्रमाणात भाष्यही होत आहे. परंतु ‘फोर्स ऑफ नेचर’ हा चित्रपट वेगळा असून तो दुसऱ्या बाजूवर भाष्य करतो, असे त्यांनी सांगितले.
भारतीय चित्रपटांतील विविधता वाखाणण्याजोगी असून ऑस्ट्रेलियन चाहत्यांना देखील जेवढे ऑस्ट्रेलियन चित्रपट आवडतात, असे कोनोली यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियात बनविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये तेथील निसर्ग मोठ्या प्रमाणात चित्रित केला जातो. दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे की, निसर्ग चित्रपटाचे चारित्र्य दाखविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. तसेच निसर्ग, पर्यावरणाचे चित्रीकरण ऑस्ट्रेलियन चित्रपटांना इतर युरोपियन चित्रपटांपेक्षा वेगळा ठरवित असल्याचे कोनोली यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.