Sarah Todd Dainik Gomantak
गोवा

Australian Celebrity Chef: '..नेहमी इथेच राहावेसे वाटते'! ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ 'सारा' गोव्याच्या प्रेमात

Goa News: ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ सारा टोड हिची ऑस्ट्रेलिया आणि गोवा दरम्यान सतत भ्रमंती चालू असते. गोव्याच्या तसेच भारताच्या विविध प्रांतांतील पाककृतींची ओळख तिने जगाला करून दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Australian celebrity chef Sarah Todd is a frequent traveler between Australia and Goa

ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ सारा टोड हिची ऑस्ट्रेलिया आणि गोवा दरम्यान सतत भ्रमंती चालू असते. गोव्याच्या तसेच भारताच्या विविध प्रांतांतील पाककृतींची ओळख तिने जगाला करून दिली आहे. साराला गोमंतकीय पाककृतींचा आस्वाद घ्यायला आणि त्यासंबंधी अधिक जाणून घ्यायला आवडते.‌ पोर्तुगीज प्रभावातून निर्माण झालेल्या गोमंतकीय पाककृतीच्या स्वादात काहीतरी विशेष आहे असे ती म्हणते. 

गोव्यात मोटरसायकल चालवत प्रवास करणे तिला विशेष आवडते. भारतात इतर ठिकाणी मात्र मोटरसायकलवरून प्रवास करायला ती पसंत करत नाही कारण इतर ठिकाणी आपण 'नर्व्हस' होते असे ती म्हणते. पण  केसात वारा भरून गोव्यातील मोकळ्या रस्त्यावरून फिरणे, सुंदर जागा दिसताच थांबणे, रस्त्यावरील पाट्या नजरेआड करून सुंदर जागांमध्ये हरवून जाणे हा गोव्यात फिरण्याचा उत्तम मार्ग आहे असे तिला वाटते. 

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरच्या ओल्या वाळूत पाय रुतवत चालणे तिच्यासाठी एक आनंददायक गोष्ट आहे. किनाऱ्यावरून चालताना समुद्राचा गाजणारा आवाज मनाला शांतता देतो असे ती म्हणते. ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्विन्सलँड येथे ती लहानाची मोठी झाली आहे. तोदेखील गोव्यासारखाच उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे. त्यामुळे गोवादेखील तिला सुरक्षित आणि आरामदायक वाटतो. 

निसर्ग तिला आवडतो. गोव्यातील दोन  रेस्टॉरंट्समध्ये तिची भागीदारी आहे.‌ तिथं तिने सुमारे ८००० झाडे आणि रोपे पावसाळ्यापूर्वी लावली आहेत. त्या रोपट्यांनी आणि झाडांनी पावसाळ्यानंतर जे हिरवे रूप धारण केले आहे त्यामुळे ती खुश आहे. गोव्यातील निसर्ग आपोआपच भव्य आणि देखणे रूप घेतो त्यामुळे नेहमीच इथे राहावे असे तिला वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT