Attempt of Congress MLAs to change power in quepem municipality Dainik Gomantak
गोवा

केपे पालिकेत सत्ता बदलण्यासाठी काँग्रेस आमदारांचे प्रयत्न

एल्टन डिकॉस्‍टा यांना ही पालिका ताब्यात घेण्यासाठी कवळेकर गटातील तीन नगरसेवकांना फोडावे लागणार

दैनिक गोमन्तक

केपे : केपे मतदारसंघावर चार वेळा आपले वर्चस्व अबाधित ठेवलेल्या बाबू कवळेकर यांचा पराभव करून किंग मेकर ठरलेले एल्टन डिकॉस्‍टा यांनी आता केपे पालिका मंडळ आपल्याकडे ओढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. हे मंडळ सध्या बाबू कवळेकर यांच्या ताब्यात असल्याने पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी डिकॉस्‍टा यांनी काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

केपे (quepem) पालिकेत एकूण तेरा सदस्य असून नऊ बाबू कवळेकर (Babu-Kavalekar) यांचे तर चार एल्टन डिकॉस्‍टा यांचे समर्थक आहेत. केपे पालिकेत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने सुचिता शिरवईकर यांच्याकडे हे पद आहे. एल्टन डिकॉस्‍टा यांना ही पालिका ताब्यात घेण्यासाठी कवळेकर गटातील तीन नगरसेवकांना फोडावे लागणार आहे. यात त्यांना कितपत यश येते ते पाहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) नऊ पैकी फक्त आठ नगरसेवकांनी बाबू कवळेकर यांच्यासाठी काम केले होते यात फिलू डीकोस्ता यांनी कवळेकर यांच्या एकाही प्रचारसभेत भाग घेतला नसल्याने डिकॉस्‍टा यांनी कवळेकर यांच्यासाठी काम केले नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

एल्टन डिकॉस्‍टा हे जरी आमदार (MLA) झाले असले तरी त्यांना पालिका मंडळ स्थापन करण्यास सहजासहजी यश येणार नसल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. कवळेकर यांचे या पालिकेवर (municipality) वर्चस्व असून ज्या नगरसेवकांनी कवळेकर यांच्यासाठी काम केले नाही त्यांना बाजूला सारून कवळेकर हे परत एकदा मंडळात फेरबदल करू शकतात असे खास सूत्रांकडून समजले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT