Farmers Trouble  dainik gomantak
गोवा

म्हादईत पाळीव गोवंश संकटात; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सत्तरीत पुन्हा पट्टेरी वाघांच्या डरकाळ्या, डोंगुर्ली ठाणे पंचायत भागात गोवंशावर हल्ला

Priyanka Deshmukh

वाळपई Walpai : सत्तरी तालुक्यात पुन्हा एकदा पट्टेरी वाघांच्या (Tiger) डरकाळ्या ऐकू येत आहेत. डोंगुर्ली - ठाणे (Dongurli Thane) पंचायत क्षेत्रातील गोळावली, रिवे आदी ठिकाणी पट्टेरी वाघीण व बिबट्या वाघांचा संचार समोर आला आहे. हल्लीच गोळावली, रिवे भागातील धनगरवाड्यावर मालो पावणे तसेच भिकाजी बैलूडकर यांच्या गोठ्यातील गोवंशावर हल्ला होण्याचा प्रकार घडला आहे. लहान तीन वर्षाचे रेडा पाडूक याला पट्टेरी वाघ (मादी) याने हल्ला करून मारल्याची (Farmers Trouble) घटना समोर आली आहे.

त्यात सुरवातीला पट्टेरी वाघीणेने अर्धे भक्षण केले व नंतर बिबट्याने भक्षण केले आहे. तसेच जर्सी गायीच्या दोन पाडसांवर हल्ला करण्यात आला. त्यात एक पाडस मरण पावले आहे, तर दुसरे जखमी झाले आहे. डोंगुर्ली ठाणे भागातील रामा गावकर यांच्या गोवंशावर हल्ला झाला. वन्य प्राण्यांमुळे बाहेर फिरणे धोक्याचे बनले आहे. धनगरवाड्यावरील मालो पावणे यांच्या गोवंशावर हा दुसरा हल्ला आहे. 2020 साली गोळावली भागात घडलेल्या घटनेत पट्टेरी वाघाच्या हल्यात मालो पावणे यांच्या गोवंशाचा मृत्यू झाला होता. ही दुसरी घटना या कुटुंबियांच्या बाबतीत होऊन गेली आहे.

दोन तीन दिवसांपूर्वी सदर घटना समोर आल्यावर म्हादई वन विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हर्ष यांनी पंचनामा केला आहे. पट्टेरी वाघीणीने रेडा पाडकाला अर्धवट खाऊन टाकले होते. त्यानंतर बिबट्याने फडशा पाडला आहे.

म्हादईत पाळीव गोवंश संकटात

म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघांचा संचार असल्याचे याआधीच समोर आले होते. 2020 साली गोळावली भागात गोवंशावर पट्टेरी वाघांनी हल्ला करून मारले होते. त्यानंतर दीड वर्षांनी पुन्हा एकदा पट्टेरी वाघांचा अधिवास म्हादईत दिसून आला आहे, त्यामुळे पाळीव गोवंश संकटात सापडला असून लोकांना आर्थिक नुकसानी सोसावी लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT