Valpoi Maria Bar Attack Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वाळपईत नागरिकासह पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; एकास अटक, बार परिसरातील वादाचे रूपांतर मारहाणीत

Valpoi Maria Bar Attack: या हल्ल्यात लखपत सिंग यांना रक्तस्त्रावासह दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पीसीआर पथक घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: येथील ‘मारिया’ बार परिसरात एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी सुनील गजानन मडकईकर (३६, रा. गवळेभाट-चिंबल) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील याने काल शनिवारी रात्री अकराच्‍या सुमारास वाळपई येथील ‘मारिया’ बारजवळ लखपत सिंग यांच्यावर वाहनाच्या चावीने डोक्यावर व पाठीवर वार करून तसेच ठोसे मारून जखमी केले.

या हल्ल्यात लखपत सिंग यांना रक्तस्त्रावासह दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पीसीआर पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना आरोपीने आक्रमक होत हेड कॉन्स्टेबल ओली खान यांच्यावर हल्ला केला. त्यांना थपडा व ठोसे मारून नाक आणि चेहऱ्यावर दुखापत केल्याचा आरोप आहे.

तसेच पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी हेड कॉन्स्टेबल ओली खान यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी साहाय्‍यक उपनिरीक्षक नामदेव गावस यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळपई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

‘बार’च्या वेळांवरही प्रश्नचिन्ह

घटना रात्री उशिरा बार परिसरात घडल्याने वाळपईतील काही बार निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. संबंधित यंत्रणांनी याबाबत तपास करून नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT