Atrocities on foreign minor girl in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात विदेशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयित योगेश मांद्रेकरला अटक, दोन दिवसांची कोठडी

दैनिक गोमन्तक

पणजी: विदेशी नागरिक असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित योगेश मांद्रेकर या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. म्हापसा न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली असून, मुलीने हल्लीच तिच्या आईला सांगितल्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्याची आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई ही विदेशी नागरिक असून तिने एका ओडिशा तरुणाशी विवाह केला होता. पती तिच्यापासून दूर झाला होता.

संशयित योगेश मांद्रेकर याची या महिलेशी ओळख झाली होती. त्यामुळे पर्वरी येथे राहत असलेल्या या महिलेच्या घरी येणे - जाणे होते. त्यातूनच अल्पवयीन मुलीचे त्याने लैंगिक शोषण केले. ही घटना नोव्हेंबर 2021 मध्ये घडली होती. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने त्याची माहिती आईला दिल्यावर तिने पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार म्हापसा येथील योगेश मांद्रेकर याला अटक करण्यात आली. पीडित मुलगी व संशयितांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा तपास पर्वरीच्या महिला पोलिस उपनिरीक्षक करत आहेत. संशयित योगेश मांद्रेकर याच्याविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायदा तसेच बाल कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT