पणजी : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला. आतिशी भाजपची बाहुली बनल्या असून, स्वतःचा पक्ष भ्रष्टाचारात बुडाला असताना काँग्रेसची बदनामी करण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया चेअरमन अमरनाथ पणजीकर यांनी केला.
"आतिशी भाजपच्या एजंट झाल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांना खूष करण्यासाठी त्या सतत काँग्रेसविरोधात विष ओकत आहेत. आतिशी यांची ही धडपड म्हणजे दिल्लीतील कोट्यावधी दारू घोटाळ्यापासून आपच्या नेत्यांना वाचवण्यासाठी केलेला निष्फळ प्रयत्न आहे," असा हल्लाबोल अमरनाथ पणजीकरांनी केला.
"दिल्लीत आपने दारू घोटाळ्यातून जनतेचे पैसे लुटले; गोव्यात त्यांनी भाजपला मदत करण्यासाठी केवळ मते फोडण्याचे काम केले. आता परत आतिशी भाजपच्या तालावर नाचत आहेत कारण त्यांचे नेते अटकेची भीती आहे. कितीही नाटकं, खोटं किंवा प्रचार केला तरी कायद्यापासून त्यांना कोणीही वाचवू शकत नाही," असे पणजीकर म्हणाले.
आप पक्षाला भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार संपला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेला पक्ष आज स्वतःच भ्रष्टाचाराचे प्रतीक बनला असल्याचे पणजीकर म्हणाले.
आप आता भाजपची बी-टीम असल्याचे स्पष्ट झालंय असा आरोपही त्यांनी केला. जप आणि आप हातात हात घालून चालत असून, दोघांनीही गोमंतकियांची फसवणूक केल्याचा आरोप पणजीकरांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.