Atal Setu Road Closure Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Atal Setu Road Closure: या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: जुने गोवेहून पणजीकडे येताना मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा मार्ग दुरुस्ती व त्रुटी निवारणाच्या कामासाठी २५ जूनपर्यंत तात्पुरता बंद ठेवण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या कालावधीत या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अधिकृत माहितीनुसार, या मार्गावर आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक सुधारणा (रेक्टिफिकेशन वर्क) करण्यात येणार आहे.

त्यामुळे फोंडा बाजूकडून अटल सेतूमार्गे पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या मार्गाचा थेट वापर करता येणार नाही. अशा वाहनांसाठी नवीन मांडवी पूल व अटल सेतूवरील मेरशी चौक हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान, या बंदमुळे सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पणजी, फोंडा, मेरशी आणि पर्वरीदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कंत्राटदाराला सक्त निर्देश

वाहतूक सुरळीत राहावी आणि वाहनचालकांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागावा, यासाठी गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळ तसेच संबंधित कंत्राटदाराला विविध उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये आवश्यक ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक उभारणे, वाहतूक नियमनासाठी मार्शल्सची नियुक्ती करणे, रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT