Green Atal Setu aninews
गोवा

Atal Setu: अवयवदान जागृतीसाठी अटल सेतू 'हिरवागार'

Indian Organ Donation Day: मोहन फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा यांनी हा उपक्रम घेतला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जागरूकता निर्माण करण्यासाठी अटल सेतू पुलावर शुक्रवार २ ते ४ ऑगस्टपर्यंत हिरव्या रंगचा प्रकाशझोत सोडण्यात येणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन डिचोली शाखा अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

डॉ. शेखर साळकर म्हणाले, हिरवा रंग म्हणजे प्रत्यारोपाद्वारे जीवनात दुसऱ्या संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी आशेचे प्रतीक आहे. मोहन फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा यांनी हा उपक्रम आयोजित घेतला आहे. हिरव्या रंगात अटल सेतू प्रज्वलित करून आम्ही अधिक लोकांना त्यांचे अवयव गरजूंना दान करण्यासाठी प्रेरित करू, अशी आशा डॉ. साळकर यांनी व्यक्त केली.

मोहन फाऊंडेशनचे प्रतिनिधी गॅब्रिएल परेरा म्हणाले, अटल सेतू पुलावर हिरवा प्रकाश टाकण्याची कल्पना केवळ अवयवदानाविषयी जनजागृती करणे नव्हे, तर कुटुंब आणि समुदायांमध्ये अवयवदानाविषयी लोकांमध्ये संभाषण सुरू करणे ही आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा राज्य अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर म्हणाले, सध्या एक दशलक्षाहून अधिक भारतीय अंतिम टप्प्यातील अवयव निकामी झाल्याने ग्रस्त आहेत. १०% पेक्षा कमी लोकांना वेळेवर मदत मिळत आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी लांबलचक प्रतीक्षा यादीचे प्राथमिक कारण म्हणजे मेंदूच्या मृत्यूनंतर अवयवदानाच्या शक्यतेबद्दल जागरूकता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

SCROLL FOR NEXT