Accident Goa Dainiak Gomantak
गोवा

Goa Accident: अटल सेतूवर ऑईल सांडल्याने वाहनांचा थरार, सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या; सुदैवाने जीवितहानी टळली

Oil Spill Road Accident Goa: पणजी ते पर्वरीदरम्यान अटल सेतूवर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सहा वाहनांचा विचित्र अपघात घडला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पणजी ते पर्वरीदरम्यान अटल सेतूवर रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सहा वाहनांचा विचित्र अपघात घडला. ऑईलचे काही थेंब सांडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरून एकापाठोपाठ एक अशी सहा वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून जाणाऱ्या एका वाहनातून ऑईल सांडले होते. ते सुकल्याने चालकांना त्याचा अंदाज आला नाही. वाहने वेगात असताना टायर घसरल्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटले आणि एकापाठोपाठ एक अशा सहा गाड्या एकमेकांना धडकल्या.

या सहा गाड्यांव्यतिरिक्त आणखी दोन गाड्यांनाही किरकोळ फटका बसला; मात्र नुकसान कमी असल्याने आणि चालकांना घाई असल्याने ते घटनास्थळावरून निघून गेले. सहा गाड्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे ती वाहने घटनास्थळावरच थांबली होती. घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला आहे. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.

कचऱ्याचा साठा; नियमभंगही सुरूच

१ अटल सेतूवर दोन ठिकाणी जुन्या गाद्या, पोती व इतर कचरा साचलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळही साचली असून त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या पुलावर अशा प्रकारे कचरा साठल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

२ तसेच, अटल सेतूवर दुचाकींना परवानगी नसतानाही गेल्या काही दिवसांपासून पर्यटक तसेच स्थानिक नागरिक दुचाकींसह प्रवास करताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अनेक दिवसांपासून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून वाहतूक पोलिसही तेथे उपस्थित नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT