water Pipeline repaired  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत अखेर जलवाहिनी दुरुस्त, पाणीपुरवठा पूर्ववत

रहिवाशांना दिलासा : 15 तासांच्या प्रतीक्षेनंतर नळांना पाणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोलीत भगदाड पडलेल्या जलवाहिनीची अखेर दुरुस्ती करण्यात आली असून, शहरासह जवळपासच्या भागातील पाणी पुरवठा पूर्वपदावर आला आहे. तब्बल पंधरा तासांच्या प्रतीक्षेनंतर (शुक्रवारी) दुपारी घरघरांतील कोरडे नळ ओले झाले. नळांना पाणी आल्याने नागरिकांचा विशेषतः गृहिणींचा जीव भांड्यात पडला आहे.

पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून डिचोली शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी जलवाहिनी काल (गुरुवारी) सायंकाळी मुस्लिमवाडा-डिचोली येथे फुटली होती. रात्री उशिरापर्यंत या जलवाहिनीतून बाहेर पडून लाखो लिटर पाणी वाया गेले होते.

रात्रीपासून डिचोली शहरासह आजूबाजूच्या परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे जनतेचे विशेषतः गृहिणींचे प्रचंड हाल झाले होते.

मोठे भगदाड पडल्याने जलवाहिनीतून कारंजाप्रमाणे पाणी बाहेर उडू लागले होते. शिवाय रस्त्यावरून धोधो अशा स्वरूपात पाणी वाहून जाऊ लागले. जलवाहिनी फुटताच सायंकाळीच जलवाहिनीतून होणारा पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला होता. तरीही रात्री नऊ वाजेपर्यंत जलवाहिनीतून झिरपून पाणी वाहत होते.

जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रात्रीच कामगारवर्ग घटनास्थळी दाखल झाला होता. तरी वाहणाऱ्या पाण्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती कामात अडथळा निर्माण झाला होता.

युद्धपातळीवर दुरुस्ती

जलवाहिनीची विनाविलंब दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले होते. आज (शुक्रवारी) सकाळी युद्धपातळीवर दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले होते. जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर दुपारी पाणी सोडण्यात आले. दुरुस्तीकाम करताना दोनदा व्यत्ययही आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT