Astrologer Gives Reason behind Downfall of Tourism in Goa
पणजी: गोव्याचे पर्यटन घटल्याचा दावा अनेकजण सोशल मिडियावरुन करतायेत. पण, राज्य सरकार मात्र, कोरोनानंतर राज्यात पर्यटकांची संख्या वाढल्याचे सांगत आहे. याबाबत त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आकडेवारी देखील प्रसिद्ध केली. असे असले तरी समाजमाध्यमांवर गोवा आणि येथील पर्यटनावर भाष्य करणाऱ्यांची संख्या वाढतच चालल्याचे दिसते. अशात गोव्याचे पर्यटन घटल्याचा दावा करत, त्याची कारणे देणारी एक 'एक्स' पोस्ट नव्याने व्हायरल होत आहे.
प्रशांत किणी नावाच्या एक्स युझरने समाजमाध्यमावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या व्यक्तीने त्याच्याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी त्याच्या बायोमध्ये ज्योतिषी, राजकारण, जिओ पॉलिटीक्स, ट्रॅव्हलर अशी माहिती देण्यात आली आहे. किणीने केलेल्या पोस्टमध्ये गोव्यातील पर्यटन का घटले याची तब्बल १३ विविध कारणे देण्यात आली आहेत. यामध्ये टॅक्सी माफिया, महागडा मुक्काम, खाद्यपदार्थ यासारखी कारणे देण्यात आली आहेत.
टॅक्सी माफिया, महागडे वास्तव्य, महागडे खाद्यपदार्थ, काही उद्धट गोंयकार, अगदीच लहान रस्ते, स्वच्छतेचा अभाव, ढीसाळ पार्किंग, वाहतूक नियोजनाचा अभाव, अनेक ठिकाणी अस्वच्छता, महागडे सीफूड, कमी दर्जाचे मद्य, समुद्रकिनाऱ्यांवरील निकृष्ट प्रवेशद्वार, आदारतिथ्य अशा समस्या प्रशांत किणी यांनी या पोस्टमध्ये मांडल्या आहेत.
किणी यांच्या या पोस्टवर अनेकांनी विविध मते व्यक्त केली आहेत. अनेकांनी या समस्यांमध्ये त्यांना आलेल्या अनुभव शेअर केलेत तर काही जणांना यावर उपाय देखील सुचवले आहेत.
'मी नुकताच गोव्यातून आलोय. गोव्यातील वाहतूक ही मोठी समस्या आहे असं मला वाटतं. मी २२ किमी प्रवासासाठी १००० रुपये दिले. मुंबईत मात्र, १४ किमी साठी ३०० रुपये देतो. गोव्यात ओला, उबेर सारख्या सुविधा मिळायला हव्यात', असे निलेश दुबे या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे.
स्वस्तात थायलंड येथील समुद्रकिनाऱ्यांना भेट देणे गोव्याला जाण्यापेक्षा चांगल आहे, अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने व्यक्त केली आहे. तसेच, अनेकांनी गोव्यातील पोलिसांना देखील दोष दिला आहे. राज्यातील रस्त्यांची अवस्था देखील खराब झाल्याची तक्रार काही नेटकऱ्यांनी केली आहे.
याच व्यक्तीने गोव्यातील पर्यटनाच्या समस्येवर सहज तोडगा काढता येईल, असे म्हणत यासाठी आवश्यक उपायांची देखील यादी दिली आहे.
या पोस्टमध्ये किणी यांनी राज्यातील बीच स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, महत्वाच्या पर्यटनस्थळांवर प्रवेश शुल्क लागू करणे, राज्यात ओला उबेर सुविधा सुरु करणे, रस्ते अधिक रुंद करावेत, अधिक वाहतूक पोलिस तैनात करावेत अशा विविध सूचना त्यांनी केल्या आहेत.
प्रशांत किणी यांनी आणखी एक पोस्ट करत गोवा राज्य सरकारवर देखील पर्यटन कमी होण्याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. फोंड्यातील शांतादुर्गा आणि रामनाथ मंदिराला जोणारा रोड गेल्या १८ महिन्यांपासून ड्रेनेज लिकेजच्या दुरुस्ती कामामुळे बंद असल्याचा दावा त्यांनी या पोस्टमधून केला आहे. देश चंद्रावर पोहोचला तरी गोवा सरकारला मात्र लिकेजचे कारण मिळत नाहीए, अशी खोचक टीका या व्यक्तीने पोस्टमधून केलीय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.