Assonora car accident Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

Assonora car accident: अस्नोडा येथे रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात दीपेश मांद्रेकर (वय ३७, अस्नोडा) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Panditrao

म्हापसा: अस्नोडा येथे रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात दीपेश मांद्रेकर (वय ३७, अस्नोडा) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपेश आणि रितेश शिरगावकर हे दोघे कारने अस्नोड्याकडे जात असताना रस्त्यानजीक असलेल्या कालव्यात कार अचानक कोसळली.

स्थानिकांनी घटना पाहताच त्वरित मदतीस धाव घेतली. कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दीपेशला त्वरित वाचवता आले नाही, मात्र चालक रितेश शिरगावकर याला स्थानिकांनी बाहेर काढले आणि त्वरित रुग्णवाहिकेतून म्‍हापसा येथील इस्पितळात उपचारासाठी पाठवले.

कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृत्यूमुखी पडलेल्या दीपेश याचा मृतदेह आणि अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने कालव्यातून बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे नेमके कारण अहवालावरून स्पष्ट होईल.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालव्याच्या पाण्याचा वेग वाढला होता. वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा अशी दुर्घटना होऊ शकते. या प्रकारामुळे स्थानिक चिंता व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT