Assembly Election Results 2026 Dainiak Gomantak
गोवा

Assembly Election 2026: सिनेपडद्यानंतर आता राजकारणातही 'विजय'! प्रस्थापितांना धूळ चारत मिळविला ऐतिहासिक विजय, ममतांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले!

BJP Victory West Bengal: उत्तरेनंतर भाजपच्या विजयाचा वारू पूर्वेलाही चौखूर उधळला. प्रस्थापितविरोधी लाट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा यामुळे प्रथमच पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले असून जनतेने ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला नाकारले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोलकता-चेन्नई (पीटीआय): उत्तरेनंतर भाजपच्या विजयाचा वारू पूर्वेलाही चौखूर उधळला. प्रस्थापितविरोधी लाट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा यामुळे प्रथमच पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले असून जनतेने ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला नाकारले आहे. दक्षिणेकडे तमिळी जनतेला नवा नायक मिळाला असून अभिनेते विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. डाव्यांचा केरळमचा अखेरचा गडही ढासळला आहे. पाचपैकी तीन (पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळम) राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे प्रस्थापितांना नाकारणारे ठरले.

आसामच्या मळ्यात हिमंता बिस्व सरमा यांच्या रूपाने पुन्हा कमळ फुलले असून पुदुच्चेरीमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता कायम आहे. या निकालाचे राष्ट्रीय राजकारणात देखील पडसाद उमटणार हे निश्चित आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची ताकद कमी होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणखी पॉवरफुल होईल. बंगालमध्ये सलग चौथ्यांदा सत्ता मिळविण्याचे तृणमूल काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये धार्मिक ध्रुवीकरण, मतदारयाद्यांची फेरपडताळणी हे मुद्दे गाजले होते. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, समीक भट्टाचार्य, अग्निमित्रा पॉल आणि रुपा गांगुली यांची नावे चर्चेत आहेत.

तमिळनाडूच्या जनतेने अभिनेते विजय यांना जननायक ठरविले आहे. कधीकाळी दक्षिणेच्या राजकारणाचे सूत्रसंचालक ठरलेल्या एमजी रामचंद्रन आणि जे.जयललिता यांच्या रांगेत आता विजय यांचा समावेश झाला आहे. विजय यांची प्रचारमोहीम चर्चेचा विषय ठरली होती. विवाहासाठी आठ ग्रॅम सोने देण्यासह त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ६० वर्षांखालील महिलांना दरमहा अडीच हजार रुपये मदत, प्रत्येक कुटुंबाला सहा मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते.

केरळममधील पराभव हा डाव्या पक्षांच्या जिव्हारी लागला असून प्रथमच देशात डाव्यांकडे कोणतेही राज्य शिल्लक राहिलेले नाही. या पराभवावर आम्ही सखोल विचारमंथन करू, असे माकपचे सरचिटणीस एम.ए.बेबी यांनी सांगितले. भाजपच्या विजयामुळे धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना बळ मिळेल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखविली. विद्यमान मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT