Assagao Restaurant Financial Fraud Dainik Gomantak
गोवा

Assagao Restaurant Financial Fraud: आसगावात 4 कोटींचा गैरव्यवहार: हणजूण पोलिसांची मोठी कारवाई; आरोपी मॅनेजरची दिल्लीतील 1.22 कोटींची मालमत्ता जप्त

4.37 Crore Fraud Case: तक्रारदाराचे तब्बल ४.३७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले होते.या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: आसगाव येथील एका प्रसिद्ध उपाहारगृहात झालेल्या तब्बल ४.३७ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हणजूण पोलिसांनी कारवाई करत आरोपीची दिल्लीतील १.२२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १०७ अंतर्गत गुन्ह्यातून मिळवलेली ही मालमत्ता जप्त करण्यात आली असून म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या कारवाईला मंजुरी दिली.

माहितीनुसार, आसगाव येथील ‘सुखा-द इंडियन प्लॅटर ऊर्फ सुकून हॉस्पिटॅलिटी’चे मालक शिवकरण सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हणजूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या उपाहारगृहात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या गुलशन कुमार सिंग याने बिलिंग नोंदींमध्ये फेरफार करून कंपनीच्या निधीचा अपहार केला आणि ते पैसे स्वतःच्या तसेच कौटुंबिक सदस्यांच्या बँक खात्यात वर्ग केले.

याद्वारे त्याने तक्रारदाराचे तब्बल ४.३७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले होते.या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी केला. तपासादरम्यान, आरोपीने अपहाराच्या पैशांमधून दिल्ली येथे स्थावर मालमत्ता खरेदी केली, निवासी घराचे बांधकाम केले, सोन्याचे दागिने खरेदी केले आणि नातेवाईकांच्या खात्यावर पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले.

या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात बीएनएसएस कलम १०७ अंतर्गत मालमत्ता जप्तीचा अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करून १६ फेब्रुवारी २०२६ रोजी या अर्जास मंजुरी देत मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्निल नाईक करत आहेत.

राज्यातील पहिलीच मोठी कारवाई

न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या पथकाने तातडीने दिल्ली गाठून कारवाई पूर्ण केली. यामध्ये आरोपीने २०२४ मध्ये बांधलेले १.२ कोटी रुपयांचे घर, दुचाकी आणि २.५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. यामुळे खटला प्रलंबित असताना आरोपीला ही मालमत्ता विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही.

गुन्ह्यातून मिळवलेला पैसा शोधून काढून तो जप्त करण्यासाठी गोव्यात बीएनएसएस कलम १०७ चा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले असून फसवणुकीच्या प्रकरणात थेट मालमत्ता जप्त करण्याची गोव्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bank Fraud: व्यावसायिक बँकांना तीन वर्षांत 41.71 कोटींचा 'चुना'; केवळ 87 लाख वसूल करण्यात यश, केंद्रीय वित्तमंत्री चौधरी यांच्या उत्तरातून समोर

Student Protesters FIR Withdrawal: 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' म्हणजे केवळ गंभीर गुन्हे; या शब्दांत सर्वोच्च कोर्टाने यंत्रणेला समज दिली

Pakistan Blast: पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट! स्वातमधील शांतता रॅलीत आत्मघाती हल्ला; 14 नागरिकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Viral Video: ''विजेच्या वेगाने आला अन्...'' कारच्या सनरुफमधून डोकावणाऱ्या तरुणावर बिबट्याचा भीषण हल्ला; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Akanksha Chaudhary: ''महिन्यातून 5-6 वेळा शरीरसंबंध ठेव'', 'लॉक अप 2 शो'मध्ये आकांक्षाचा धक्कादायक खुलासा; कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT