Asphalt work of road started Dainik Gomantak
गोवा

अन्सुले रस्त्याच्या डांबरीकरण कामास प्रारंभ

कामाचा शुभारंभ आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आला

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदारसंघातील भिरोंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या अन्सुले वाड्यावर असलेल्या रेडेघाटी ते नाणूस व्हाया अन्सुलेपर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून, या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला चालना मिळाली असून, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण होत आहे. त्याचप्रमाणे इतर पंचायत क्षेत्रांतील प्रलंबित असलेली रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लागतील, असे आश्‍वासन राणे यांनी दिले.

सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी सुमारे 90 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे तांत्रिक विभाग अधिकारी सावईकर यांनी सांगितले.

यावेळी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, भिरोंडा पंचायतीचे सरपंच आद्राद तेरेझा, स्थानिक पंच समीर बागी, माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे, सदा गावकर, अन्सुले वाड्यावरील ज्येष्ठ नागरिक तथा गोवा धनगर समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष बाबू हुमाणे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT