Ashish Nehra Canva
गोवा

Ashish Nehra: आशिष नेहराला दणका; रस्त्याच्या कामाप्रकरणी पंचायतीने धाडली कारणे दाखवा नोटीस

Quelossim Panchayat: क्रिकेटपटू आशिष नेहरा घराजवळ रस्त्याचे कामकाज सुरू आहे. हे काम केळशी पंचायत क्षेत्रात येत असून पंचायतीची परवानगी न घेता रस्ता करीत असल्याबद्दल पंचायतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावलेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Quelossim Panchayat Issues Notice to Ashish Nehra for Illegal Roadwork

फातोर्डा: क्रिकेटपटू आशिष नेहरा घराजवळ रस्त्याचे कामकाज सुरू आहे. हे काम केळशी पंचायत क्षेत्रात येत असून पंचायतीची परवानगी न घेता रस्ता करीत असल्याबद्दल पंचायतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावलेली आहे.

नेहरा यांनी रस्ता तयार करण्यासाठी पंचायतीची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. त्यामुळे या प्रकरणी स्थानिकांनी पंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. हा विषय गंभीरतेने घेऊन सरपंच डिक्सन वाझ यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. हा रस्ता तयार करतेवेळी वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी आत शिरत आहे. तसेच स्थानिकांच्या घरांना व त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

गोवा

या प्रकरणी बोलताना सरपंच वाझ म्हणाले, ती त्याची खाजगी मालमत्ता असली, तरी येथील झाडांची कत्तल करताना त्यांनी पंचायतीची परवानगी घेणे गरजेचे होते. त्यामुळे येथील पर्यावरणाला धोका उत्पन्न निर्माण झाला आहे.

मालकाने ३०० झाडांची लागवड करु असे सांगितले होते. मात्र येेथे एकही रोपटे लावलेले दिसत नाही, असे शेल्डन नामक स्थानिकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT