शहरातील बसस्थानकाजवळ तर मजुरांची मोठी समस्या असून, हे मजूर (Laborer) चक्क भर रस्त्यावरच गर्दी करतात. Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत मजुरांचा बेशिस्तपणा, रस्त्यावरच गर्दी, अपघाताचा धोका

शहरातील बसस्थानकाजवळ तर सध्या रोज जवळपास 500 मजुरांचा वावर असतो. मजुरांची (Laborer) जत्राच भरत असल्याचे चित्र दिसून येत असते.

दैनिक गोमन्तक

डिचोली: शहरात पुन्हा एकदा मजुरांचा (Laborer) आकडा वाढला असून, या मजुरांकडून दिवसेंदिवस बेशिस्तपणाही वाढत आहे. शहरातील बसस्थानकाजवळ तर मजुरांची मोठी समस्या असून, हे मजूर चक्क भर रस्त्यावरच गर्दी करतात. मजूरलोक रस्ता (Road) व्यापत असल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असतो. मजुरांच्या या बेशिस्त गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने एखादेवेळी मोठी भयानक आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही वाहनचालक व्यक्त करीत आहेत. दुसऱ्याबाजूने 'कोविड'चे (Covid 19) संकट असतानाही या मजुरांकडून सामाजिक नियमांना तिलांजली देण्यात येत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून डिचोलीत (Bicholim) पुन्हा एकदा मजुरांचा गजबजाट वाढला आहे. शहरातील बसस्थानकाजवळ तर सध्या रोज जवळपास 500 मजुरांचा वावर असतो. मजुरांची जत्राच भरत असल्याचे चित्र दिसून येत असते.

.. तर भयानक आपत्ती

सध्या सकाळच्या वेळी साधारण 8 वा. शहरातील बसस्थानकावर गेल्यास कामाच्या प्रतीक्षेत थांबणाऱ्या मजुरांचे लोंढे नजरेला पडतात. हे मजूर दाटीवाटीने थांबलेले असतात. माणिक बार समोरील बसस्थानकावर जाणाऱ्या रस्त्यावर तर मजुरांची जत्राच भरल्याचे चित्र दिसून येते. बेशिस्तपणे भर रस्त्यावर हे मजूर गर्दी करून थांबलेले असतात. मजुरांच्या गर्दीमुळे वाहतुकीसही मोठा अडथळा निर्माण होत असतो. अनावधाने एखादेवेळी वाहनचालकाचे लक्ष विचलीत झाल्यास भयानक आपत्ती ओढवण्याची संभावना नाकारता येत नाही. तशी भीतीही वर्तविण्यात येत आहे.

नियमांना तिलांजली

सध्या 'कोविड'ची स्थिती नियंत्रणात असली, तरी पूर्ण धोका अद्याप टळलेला नाही. असे असतानाही या मजुरांकडून सामाजिक नियम पाळण्यात येत नाहीत. हे मजूर दाटीवाटीने राहतानाच मास्क परिधान करण्याचेही टाळतात. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. एरव्ही शहरात एखादा ग्राहक किंवा नागरिकाने 'मास्क' परिधान केले नसल्याचे आढळून आल्यास त्याला दंड ठोठावण्यात येतो. मात्र बेधडकपणे सामाजिक नियमांना तिलांजली देणाऱ्या या मजुरांकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या मजुरांपासून धोका निर्माण होण्याआधीच त्यांच्या बेशिस्तपणाला लगाम घालण्यासाठी संबंधित यंत्रणेने पावले उचलावीत. अशी मागणी वाहनचालक आणि सामान्य जनतेकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT