Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: लाडफेतील कळसोत्सवाची सांगता

धुलिवंदन झाल्यानंतर परंपारिक रितीरिवाजांनुसार कळसोत्सवाला प्रारंभ झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

लाडफे-डिचोली येथील श्री सातेरी केळबाय देवस्थानच्या वार्षिक कळसोत्सवाची सांगता आज सोमवारी उत्साहात झाली. काल रविवारी धुलिवंदन झाल्यानंतर परंपारिक रितीरिवाजांनुसार कळसोत्सवाला प्रारंभ झाला होता.

लाडफे गावासह सोनारभाट येथील प्रत्येक घरोघरी श्रींचे कलश नेण्यात आले. तेथे कलशांची भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यात आली. आज दुपारी कलशांचे मंदिरात आगमन होऊन या उत्सवासह शिगमोत्सवाची सांगता झाली.

दरम्यान, लाडफे गावातील शिगमोत्सवाचे आकर्षण असलेली वैशिष्ट्यपूर्ण घोडेमोडणी उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी श्री सातेरी केळबाय मंदिरात पारंपरिक पद्धतीने तीन घोडे सजविल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले.

नंतर ढोलताशांच्या गजरात घोडेमोडणीला प्रारंभ झाला. मंदिर परिसरात स्थानिकांसह ढोलताशांच्या तालावर घोडे नाचल्यानंतर चव्हाट्यावर घोडेमोडणीचे विसर्जन करण्यात आले. घोडेमोडणी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दरम्‍यान, डिचोली तालुक्‍यात सध्‍या सर्वत्र शिगमोत्‍सवाची धूम सुरू आहे. त्‍यामुळे सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे. गावागावांत, खेड्यापाड्यांत शिगमोत्‍सवानिमित्त कळसोत्‍सव, घोडेमोडणी, चोरोत्‍सव यांसह अन्‍य धार्मिक विधी सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT