Chief Minister Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

केजरीवालांनी होंड्यातील आजोबा देवाचे घेतले दर्शन

होंडा, कुडणे व हरवळे सीमेवर असलेले प्रसिद्ध श्री आजोबा देवस्थानाला दुपारी एक वाजता भेट देऊन दर्शन घेतले.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: सत्तरी तालुक्याच्या दौ-यावर आलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी परीतीचा प्रवास करताना होंडा, कुडणे व हरवळे सीमेवर असलेले प्रसिद्ध श्री आजोबा देवस्थानाला दुपारी एक वाजता भेट देऊन दर्शन घेतले. राज्यात आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस गोव्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज वाळपई मतदार संघात येणाऱ्या बुद्रुक व पर्ये मतदार संघात येणाऱ्या म्हाऊस येथे भेट देऊन नागरिकांना संबोधित केले. त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघताना त्यांनी होंडा येथिल प्रसिद्ध अशा श्री आजोबा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्या सोबत काल आम आदमी पक्षात प्रवेश केलेले गोवा माईनिग पीपल्स फ्रंटचे प्रमुख पुती गावकर, आप पक्षाचे राज्य समन्वयक राहूल म्हाबंरे, शुभम शिवोलकर, पुंडलिक माडकर आदी उपस्थित होते. यावेळी मात्र दिल्ली येथे जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश केलेले पर्ये मतदार संघातील भाजपाचे माजी पदाधिकारी अॅड गणपत गावकर हे खुद्द पर्ये मतदारसंघातील असुन सुद्धा त्यांची उपस्थिती दिसली नाही, सदर भेट देतेवेळी त्यांच्या सोबत ॲड गणपत गावकर हे उपस्थित असतील असे अपेक्षित होते. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते पुंडलिक माडकर यांनी अरविंद केजरीवाल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT