Arvind Kejriwal on Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

पर्रीकरांच्या कुटुंबासोबत भाजपकडून 'यूज अँड थ्रो' पॉलिसीचा वापर : केजरीवाल

पणजीतून आपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची अरविंद केजरीवालांकडून खुली ऑफर

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपने पर्रीकरांच्या कुटुंबासोबत जे केलंय त्यामुळे गोव्यातील जनता अस्वस्थ झाली आहे. भाजपची 'यूज अँड थ्रो' पॉलिसी पर्रीकरांच्या कुटुंबासोबत वापरलं जाणं दुर्दैवी आहे. आम्ही मनोहर पर्रीकरांचा आदर करतो, उत्पल पर्रीकरांना जर आपमध्ये यायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे, अशा शब्दात आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खुली ऑफर दिली आहे. (Arvind kejriwal on Utpal Parrikar News Updates)

उत्पल पर्रीकरांना जर पणजीतून आपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करतो, अशा शब्दात अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) उत्पल यांना आपमध्ये येण्याचं आमंत्रणच दिलं आहे. उत्पल पर्रीकरांना भाजपने आपल्या 34 उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने केजरीवालांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने आपली 'यूज अँड थ्रो' पॉलिसी मनोहर पर्रीकरांच्या (Manohar Parrikar) कुटुंबीयांसोबतही वापरल्याचा निशाणाही त्यांनी साधला आहे.

दरम्यान भाजपकडून उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) पणजीऐवजी डिचोली मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र भाजपची ही ऑफर उत्पल पर्रीकरांनी धुडकावून लावली आहे. डिचोलीतून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, त्यामुळे डिचोलीच्या जागेचा प्रश्नच उद्धवत नाही. पणजीतूनच निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं उत्पल पर्रीकरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्याकडे उपलब्ध पर्यायांबाबत विचार सुरु असून लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT