Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

केजरीवाल उद्या गोव्यात मोठी घोषणा करण्याची शक्यता

आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या गोवा दौऱ्यात केजरीवाल 'आप'चा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केजरीवाल आपल्या या दौऱ्यात नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मागच्याच आठवड्यात अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर आले होते. अरविंद केजरीवल शनिवार आणि रविवार दोन दिवसाच्या गोव्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी लोकांची भेट घेतली आणि पक्षाचा प्रचार केला. यावेळेस त्यांनी भाजप विरोधी युतीबद्दलही सूचक वक्तव्य केले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश न मिळाल्यास आप सरकार स्थापन करण्यासाठी भाजपविरोधी पक्षाबरोबर युती करण्याचा विचार करेल, असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले.

मात्र हे बोलताना त्यांनी निवडणुकांच्या (Election) आधी कुठल्याही पक्षाबरोबर युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. आप स्वबळावर गोवा विधानसभा निवडणूक लढवेल, असे ते म्हणाले. त्यातच आता केजरीवाल बुधवारी आपल्या गोवा दौऱ्यात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT