Republic Day tableaux design Dainik Gomantak
गोवा

Republic Day 2025: अभिमान! दिल्लीतील संचलनासाठी गोव्याचा सिद्धेश साकारणार दोन चित्ररथ

Siddhesh Desai: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणारे अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांचे चित्ररथ साकारण्याची संधी यंदा गोव्याचे सुपुत्र सिद्धेश देसाई यांना लाभली आहे.

Sameer Panditrao

Siddhesh Desai Chitraratha Goa

पणजी: नवी दिल्लीतील कर्तव्यपथवर होणाऱ्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणारे अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांचे चित्ररथ साकारण्याची संधी यंदा गोव्याचे सुपुत्र सिद्धेश देसाई यांना लाभली आहे. देशपातळीवरील प्रतिष्ठीत संचलनात दोन-दोन राज्यांचे चित्ररथ साकारण्याची संधी मिळालेले देसाई हे एकमेव गोमंतकीय आहेत. सिद्धेश देसाई यांच्या विनायक डेकोरेटर्स आस्थापनच्या माध्यमातून हे चित्ररथ साकारण्यात येणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशभरातून आणि परदेशातून लाखो लोक सहभागी होत असतात. या संचलनात विविध राज्यातील संस्कृती दर्शवणारे चित्ररथ हे प्रमुख आकर्षण असते. यंदाचे अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांचे चित्ररथ हे विनायक डेकोरेटर्सच्या सिद्धेश देसाई यांच्या कल्पकतेतून साकारले जाणार आहेत.

देसाई गोव्यात गेली अनेक वर्षे इफ्फीची सर्व सजावट यशस्वीरित्या साकारत आहेत. त्याखेरीज शिगमोत्सव व कार्नीवालची सजावटीचे कामही तेच पाहत आसतात. गोव्यासाठीही त्यांनी याआधी दोन वेळा नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील सहभागी चित्ररथ तयार करण्याची कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT