Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

बालपणीच कला आत्मसात कराव्यात: दिलायला लोबो

कायसूवमध्ये बालभवनच्या शिबिराचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

म्हापसा: संस्कृती रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी युवा पिढीवर आहे. त्यासाठी मुलांनी बालपणीच विविध कला आत्मसात कराव्यात. हे लक्षात घेऊन उन्हाळी सुटीत लहान मुलांना विविध कलाकौशल्यांचे ज्ञान देण्यासाठी दहा दिवसीय प्रशिक्षिण शिबिरांचे आयोजन बालभवनतर्फे करण्यात आले आहे, असे प्रतिपादन शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी केले.

कायसूव येथील साखळेश्वर महिला मंडळ आणि बालभवनतर्फे कायसूव येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रमुख वक्ते योग शिक्षक नारायण राठवड, विशेष निमंत्रित ‘कोकण मराठी परिषद, गोवा’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, शिबिराच्या संयोजक असलेल्या शिवोली गट काँग्रेसच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, शिवोली गट युवा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. रोशन चोडणकर व बालभवनचे प्रशिक्षक दीपक शिरोडकर उपस्थित होते.

या शिबिरात संगीत, गायन, तबलावादन, संवादिनीवादन, चित्रकला, हस्तकला, देशभक्तीगीत, बालगीत, निसर्गगीत, स्वागगीत, चित्रकला, मातीकाम, नृत्य आदी कलांचे प्राथमिक ज्ञान देण्यात येत आहे. या ज्ञानाचा उपयोग भावी शिक्षणासाठी नक्कीच होईल व त्यामुळे या संधीचा लाभ सर्व मुलांनी घ्यावा, असे आवाहनही लोबो यांनी केले.

विविध कला-कौशल्य आत्मसात केल्यास भावी जीवनात शिक्षणप्रक्रियेतही ते नेहमीच उपयुक्त ठरते, असे या वेळी सुदेश आर्लेकर म्हणाले. नारायण राठवड यांनी अतिशय खेळकर वृत्तीने ‘या बालांनो या रे या...’ हे बालगीत सादर करून मुलांकडूनही ते म्हणवून घेतले. सूत्रसंचालन अक्षता किनळेकर यांनी केले. अश्विनी गोवेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT