Goa news  Dainik Gomantak
गोवा

Vegetables in Goa: राज्यात भाजीपाल्याची आवक वाढली

140 ते 160 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे टॉमेटो आता 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

मागील दोन महिने कडाडलेला टॉमेटोचा दर आता काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आला आहे. 140 ते 160 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे टॉमेटो आता 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

कांद्या, बटाट्यांचा भावदेखील स्थिर आहे. राज्यात श्रावणात बहुतांशी कुटुंबीय संपूर्णपणे शाकाहारी आहार घेत असल्याने भाजीपाल्याची आवक वाढल्याचे विक्रेते सांगतात.

पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. मार्केटमध्ये पन्नास रुपयांना पालेभाजीच्या दोन जुड्या विकल्या जात आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. येत्या काळात भाजीपाल्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रावणात राज्यातील बहुतांशी कुटुंबांत मांसाहार वर्ज्य असल्याकारणाने मासळी आणली जात नाही. त्यामुळे या काळात नीरफणस, भाजीची केळी यांना पसंती दिली जात असल्याने त्यांचा भाव वाढला आहे.

मध्यम आकाराचा नीरफणस १५० रुपयांना एक विकला जातोय, तर १० ते २० रुपयांना एक भाजीचे केळे विकले जात आहे.

रानभाज्यांना मागणी

पणजी मार्केटमध्ये टायखिळा, कुड्डूक, फांगला, कोंब, नीरफणस तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत असून त्यांना चांगली मागणी आहे. ग्रामीण भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजीचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम झालेला नाही. सर्वत्र रानभाज्या मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT