Mangaluru - Margao Vande Bharat Express  Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express: ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे आज आगमन

Vande Bharat Express: मडगाव स्थानकावर स्वागत: मुख्यमंत्री सावंत, आमदार कामत राहणार उपस्थित

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express: मंगळुरू ते मडगाव या रेलमार्गावर उद्या शनिवार 30 डिसेंबरपासून मंगळुरू ते मडगाव व परत ‘वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे’ सुरू होत आहे. सकाळी मंगळुरू स्टेशनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीसह इतर पाच रेलमार्गांवरील ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

संध्याकाळी 3.30 वाजता ही गाडी मडगाव स्थानकावर पोहोचणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार दिगंबर कामत हे मडगाव स्थानकावर या गाडीचे स्वागत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या श्री माता वैष्णादेवी कटरा ते नवी दिल्ली, अमृतसर ते दिल्ली, कोईम्बतूर ते बंगळुरू, जालना ते मुंबई, अयोध्या ते आनंद विहार टर्मिनल या मार्गावरील ‘वंदे भारत एक्स्प्रेस’नाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

शिवाय पंतप्रधान दोन अमृत भारत रेल्वेचेही उद्‍घाटन करणार आहेत. जूनपासून मडगाव ते मुंबई ही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्यात आली होती. मडगाव स्थानकावरून धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल.

जेव्हा ही गाडी नियमीत सुरू होईल तेव्हा मंगळुरूहून सकाळी 8.30 वाजता सुटेल व मडगावला 1.05 वाजता पोहोचेल. मडगावहून ही गाडी संध्याकाळी 6.10 वाजता सुटेल व मंगळुरूला रात्री 10.45 वाजता पोहोचेल. ही गाडी उडुपी व कारवार स्थानकांवर थांबेल, असे सांगण्यात आले आहे.

प्रवासाची वेळ होणार कमी

गोव्यात यावर्षी जून महिन्यात मडगाव ते मुंबई मार्गावर धावणारी पहिली वंदे भारत गाडी सुरू करण्यात आली होती. आता कोकण रेल्वे मार्गावर धावणारी गोव्यासाठी दुसरी मडगाव जंक्शन ते मंगळुरू या मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत गाडी धावणार आहे.

30 डिसेंबरपासून या सेवेस सुरवात होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सेवेच्या प्रारंभामुळे मंगळुरू आणि मडगाव दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे या दोन्ही प्रदेशातील पर्यटन आणि व्यवसायाच्या संधींना चालना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT