Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Arpora Nightclub Fire: 25 जीव जळाले, पण मालक मिळेना! हडफडे नाईट क्लब अग्निकांडाचा 'सस्पेन्स' वाढला; संशयितांची जबाबदारी झटकण्यासाठी पळापळ

Arpora Tragedy Update: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. आगीच्या घटनेनंतर अटक केलेल्या प्रत्येक संशयिताने आपण केवळ चालक अथवा व्यवस्थापक असून क्लबची थेट मालकी आपल्याकडे नसल्याचा दावा केल्याने, या क्लबचा नेमका मालक कोण, हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, क्लबच्या दैनंदिन कामकाजासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना जबाबदाऱ्या दिल्या होत्या. परवाने, कर्मचारी व्यवस्थापन, कार्यक्रम आयोजन आणि आर्थिक व्यवहार यासाठी स्वतंत्र ‘फ्रंट पर्सन’ नेमल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात निर्णय घेणारा आणि आर्थिक नियंत्रण ठेवणारा व्यक्ती किंवा गट कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कागदपत्रांची सखोल छाननी सुरू केली आहे.

याप्रकरणी सुरेंद्र खोसला या ब्रिटीश नागरिकाचा शोध घेणे आता सुरू केले आहे. यासाठी पोलिसांकडून इंटरपोलला पुन्हा खोसलाचा शोध घेण्यासाठी आठवण करून दिली जाणार आहे. युरोपमधील देशात व्हिसाविना जाणे शक्य असल्याने खोसलाने ब्रिटन सोडले तर इतर देशांत तो पकडला जाणे कठीण होणार आहे. त्यापैकी अनेक देशांशी भारताचा प्रत्यार्पण करार नसल्याचाही अडथळा आहे.

खोसलाचा एक खटला अतिरिक्त पंचायत संचालकांसमोर प्रलंबित आहे. त्यानिमित्ताने तो गोव्यात (Goa) कोणाशी तरी संपर्क साधेल, असे गृहित धरून तपास यंत्रणेचे त्यावर लक्ष आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांनी ‘खरा दोषी’ समोर यावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. केवळ चालक किंवा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न केल्यास तो मान्य केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तपास यंत्रणांनी दिला आहे. आगीच्या कारणांसह नियमभंग, अग्निसुरक्षा उपायांची अपुरी अंमलबजावणी आणि मालकीची खरी साखळी उघड होईपर्यंत तपास अधिक तीव्र केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जाणीवपूर्वक निर्माण केली गुंतागुंत

क्लबच्या नावावर असलेले परवाने, भाडेकरार, वीजजोडणी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्रे तसेच बँक खात्यांचे व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. काही कागदपत्रांमध्ये वेगवेगळी नावे दिसून येत असल्याने मालकी जाणीवपूर्वक गुंतागुंतीची ठेवली असावी, अशी शक्यता तपास अधिकारी व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Vehicle Theft Case: गुन्हेगारी इतिहास नाही, मग कोठडी कशाला? वाहन चोरी प्रकरणात वकिलांचा जोरदार युक्तिवाद; 19 वर्षीय जेडन-गौरक्षला सशर्त जामीन

Indian Women's League: मैदानावर संघर्ष, पण नशिबाची साथ नाही! सेझा अकादमीच्या पराभवाच्या हॅट्ट्रिकने वाढले गोव्याचे टेन्शन

Goa Chicken Prices: 'पार्टी अभी बाकी है'... पण बजेटचं काय? मासळीपाठोपाठ आता चिकनच्या दरातही मोठी वाढ, खवय्यांच्या जिभेला लगाम

Valpoi Illegal Liquor Sale: रस्त्याकडेलाच रंगतायेत 'ओपन बार'! वाळपईत मद्यपींचा उच्छाद; प्रशासकीय यंत्रणा कोमात, तस्कर जोमात

Goa Drug Bust: सापळा रचला अन् शिकार टप्प्यात आली! अंमली पदार्थांचे जाळे पसरवणारे परप्रांतीय जेरबंद; वाळपई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT