Goa Nightclub Negligence 25 Deaths Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: बर्च क्लबमध्ये आग भडकली, 'तो' पळाला UK ला; सुरिंदर कुमार खोसला याला इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस

Arpora Nightclub Fire: अग्नितांडवानंतर दुसऱ्याच दिवशी सुरिंदर यूकेला गेला होता. त्याच्याकडे यूकेचे (ब्रिटीश) राष्ट्रीयत्व आहे. गोवा पोलिसांनी यापूर्वीच खोसलाविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च’ क्लब दुर्घटनाप्रकरणी गोवा पोलिसांनी नव्याने हालचाली वेगवान केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बर्च क्लबस्थित मालमत्तेचा मालक सुरिंदर कुमार खोसला याच्याविरोधात ‘इंटरपोल’ची ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अग्नितांडवानंतर दुसऱ्याच दिवशी सुरिंदर यूकेला गेला होता. त्याच्याकडे यूकेचे (ब्रिटीश) राष्ट्रीयत्व आहे. गोवा पोलिसांनी यापूर्वीच खोसलाविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती.

पोलिसांनी सांगितले की, संशयिताचे ठिकाण शोधण्यासाठी व तपासासाठी खोसला याची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

हडफडे येथील भीषण दुर्घटनेप्रकरणी हणजूण पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात खोसला हा एक संशयित आहे. या नोटिसीचा उद्देश गुन्हेगाराची ओळख, ठिकाण व त्याच्या हालचालींविषयी माहिती गोळा करणे, हा आहे.

म्हणणे मांडण्यास पोलिसांना हवा वेळ

पोलिस कोठडीत असलेला लुथरा बंधूंचा सहभागीदार अजय गुप्ता तसेच संशयित भरत कोहली या दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जासंदर्भात हणजूण पोलिसांनी विद्यमान जिल्हा पंचायत निवडणुकांमधील व्यस्ततेचे कारण देत, म्हणणे सादर करण्यासाठी शनिवारी (२० डिसेंबर) अतिरिक्त वेळ मागितला. परिणामी, म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत (२२ डिसेंबर) पुढे ढकलली आहे.

दोघांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

संशयित भरत कोहली हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो ‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लबचे दैनंदिन कामकाज चालवायचा. हणजूण पोलिस या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयात काय म्हणणे सादर करतात, हे सोमवारीच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT