Arjun Velip

 

Dainik gomantak

गोवा

अर्जुन वेळीप यांच्या आव्हान अर्जावर 7 जानेवारीला सुनावणी

अर्जुन वेळीप हे तृणमूल पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षता खात्याने सुरू केलेली चौकशी प्रलंबित आहे असे कारण पुढे करून उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप यांनी आपल्या सरकारी नोकरीचा दिलेला राजीनामा न स्वीकारण्याचा सरकारी निर्णयाला वेळीप यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून या आव्हान अर्जावर 7 जानेवारी रोजी निवाडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेळीप यांनी यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या विरोधात केपे मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा आपला इरादा यापूर्वीच स्पष्ट केला आहे. त्यासाठी त्यांनी दिलेला सरकारी नोकरीचा राजीनामा सरकारने स्वीकारणे आवश्यक आहे.

मागच्या आठवड्यात हा अर्ज सुनावणीस आला असता एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी राज्याची बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागून घेतल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. आपल्यावर जरी चौकशी सुरू करण्यात आली असली तरी आपल्यावरील आरोपात काहीच तथ्य न सापडल्याने दक्षता खात्याने ही चौकशी बंद केली होती. आपल्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होती असा दावा वेळीप यांनी उच्च न्यायालयात (High Court) केला असून त्यामुळे आपला राजीनामा सरकारला स्वीकारण्यास भाग पाडावे अशी मागणी केली आहे.

वेळीप हे सध्या बाणावली पंचायतीचे सचिव असून फातर्पा पंचायतीत ते सचिव (Secretary) म्हणून असताना त्यांनी निधीचा गैरवापर केला, अशा आशयाची तक्रार फातर्पाचे तत्कालीन सरपंच (Sarpanch) सेंझिल डिकॉस्ता यांनी दाखल केली होती. याच प्रकरणी वेळीप यांच्या विरोधात दक्षता खात्याने चौकशी सुरू केली होती. मात्र मागची कित्येक वर्षे ती शितपेटीत पडली होती.

आता आपण उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या विरुद्ध निवडणूक (Election) लढवू पाहत असल्याने हे बंद झालेले प्रकरण मुद्दामहून पुन्हा उकरून काढले आहे असा वेळीप यांचा दावा आहे. वेळीप हे तृणमूल (Trinamool) पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT