कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे. Dainik Gomantak
गोवा

राजीनामा फेटाळण्याच्या निर्णयाला अर्जूनकडून न्यायालयात आव्हान

वेळीप (Arjun Velip) यांनी आज ही आव्हान याचिका दाखल केली असून आपल्या राजीनाम्याची मागणी अन्यायकारकरित्या फेटाळून लावल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Babu Kavalekar) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी आपल्या सरकारी नोकरीचा दिलेला राजीनामा पंचायत संचालकांनी फेटाळून लावल्याने कवळेकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन वेळीप (Arjun Velip) यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले आहे.

वेळीप यांनी आज ही आव्हान याचिका दाखल केली असून आपल्या राजीनाम्याची मागणी अन्यायकारकरित्या फेटाळून लावल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला होता.

कवळेकर यांचे स्वीय सहाय्यक असलेले वेळीप हे पंचायत सचिव म्हणून काम करत होते. कवळेकर यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या इराद्याने त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र वेळीप यांच्याविरूद्ध दाखल केलेली एक तक्रार दक्षता खात्यासमोर प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.

आपल्या विरोधात दाखल केलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होती आणि दक्षता खात्याने केलेल्या चौकशीत त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे आपला राजीनामा त्या कारणावरून फेटाळून लावणे अयोग्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वेळीप हे पूर्वी बाबू कवळेकर यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखले जात होते. पंचायत सचिव असतानाही कवळेकर यांनी त्यांना आपले स्वीय सहाय्यक म्हणून कामाला घेतले होते. मात्र तिथे त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी ते काम सोडून पुन्हा सरकारी नोकरी पत्करली होती. त्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा सादर करीत आपण कवळेकर यांच्या विरुद्ध निवडणूक लढविणार हे जाहीर केले होते.

वेळीप यांचा राजीनामा फेटाळून लावल्याने ते अजूनही सरकारी नोकरच आहेत. तरी त्यांनी आपला प्रचार चालूच ठेवला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT