Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हरमलमधील चोरी प्रकरणाचा 2 दिवसांत छडा, कर्नाटकातील दोघांना अटक

या दोघांचाही अजूनही काही चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime गोवा पोलिसांची कामाप्रती निष्ठा आणि कार्यतत्परता वेळोवेळी दिसून येते. गोव्यातील अनेक गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अथक प्रयत्न करून गुन्हेगारांचा शोध घेत घटनेचा उलगडा केलाय. 29 मार्च रोजी हरमल येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात देखील पेडणे पोलिसांना यश आलंय.

पेडणे पोलिसांनी 29 मार्च रोजी हरमल येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी कर्नाटकातील रहिवासी राजप्पा गणेश पीजी आणि सूर्या डीव्ही यांना अटक केली आहे. तसेच या दोघांकडून काही चोरीच्या वस्तू देखील जप्त केल्या आहेत.

दरम्यान या दोघांना ताब्यात घेतल्यावर चौकशी सुरु असताना महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोघांचाही अजूनही काही चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून त्या संबंधी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake Voters Allegations: फातोर्ड्यात 50 हून अधिक बोगस मतदार? सरदेसाईंचा गंभीर आरोप

खरी कुजबुज: तीच वीट, तेच सरकार!

Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेत अडवणूक केल्यास पंचायत सचिव निलंबित! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कडक आदेश

UGDP Revival: गोव्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! मिकी पाशेको यांचा 'युगोडेपा'च्या पुनरागमनासाठी पुढाकार

SCROLL FOR NEXT