Arambol Beach Shack Case Dainik Gomantak
गोवा

Arambol Beach Shack: ‘त्‍या’ शॅक्‍समालकाची बाजू ऐकून निर्णय द्या! हरमल मृत्‍यूप्रकरणी पर्यटन खात्याला निर्देश; कारवाई तूर्त स्थगित

Arambol Beach Shack Case: शॅक्‍सच्या कर्मचाऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून अमर बांदेकर याला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा खून झाला.

Sameer Panditrao

Arambol Beach Shack Murder Case Update

पणजी: हरमल समुद्रकिनाऱ्यावर शॅक्‍सच्‍या कर्मचाऱ्यांच्‍या मारहाणीत स्‍थानिक अमर बांदेकर (३७) या युवकाचा मृत्‍यू झाल्‍यानंतर पर्यटन खात्याने तो शॅक्‍स जमीनदोस्त करण्याचा आदेश जारी केला. तसेच परवानाही रद्द करून २५ लाखांचा दंड ठोठावला.

मात्र ही कारवाई करण्यापूर्वी शॅक्‍समालकाला बाजू मांडण्यास वेळ न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या आदेशाला तूर्त स्थगिती दिली आहे. सदर आदेश कारणे दाखवा नोटीस म्हणून गृहीत धरून त्याची बाजू सोमवारी १७ फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजता ऐकून घेऊन निर्णय द्यावा असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

शॅक्‍सच्या कर्मचाऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून अमर बांदेकर याला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा खून झाला. याची दखल घेऊन मांद्रे पोलिसांनी शॅक्‍स कर्मचाऱ्यांना अटक करून चौकशी केली होती.

या चौकशीवेळी शॅक्‍सच्या ठिकाणी असलेला व्यवस्थापक लालचंद चौहान हा शॅक्‍स चालवत असल्याचे उघड झाले आहे. त्याने पोलिस स्थानकात भाडेकरू पडताळणी अर्ज जमा केला होता, पण वास्तव्यास असलेल्या ठिकाणची माहिती दिलेली नाही. त्यामुळे तो शॅक्‍समध्येच राहत होता हे स्‍पष्‍ट होते. याचिकादार शॅक्‍समालक मान्यूएल फर्नांडिस याने त्याला भाडेपट्टीवर शॅक्‍स चालवण्यास दिल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पर्यटन खात्याने ही कारवाई केली, अशी बाजू एजी देविदास पांगम यांनी मांडली.

शॅक्‍समालक फर्नांडिस याने नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवून पर्यटन खात्याने त्याला २५ लाखांचा रुपयांचा दंड ठोठावला.

शॅक्‍समालक मान्यूएल फर्नांडिस याचे दावे

‘सी लाँग बीच’ शॅक्‍सचा मालक मान्यूएल फर्नांडिस याने पर्यटन खात्याने जारी केलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्‍याला बाजू मांडण्याची संधी दिली नाही. तसेच शॅक्‍सच्या नियमांचा भंग झालेला नाही, असा दावा याचिकेत त्याने केला आहे. हा शॅक्‍स दुसऱ्याला चालवण्यासाठी देण्यात आलेला नाही. शॅक्‍समध्ये व्यवस्थापक म्हणून लालचंद चौहान याला कामाला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटन खात्याने केलेली कारवाई चुकीची आहे, अशी अशी बाजू फर्नांडिस याचे ॲड. अभिजीत गोसावी यांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT