Arambol Woman Trafficking Dainik Gomantak
गोवा

Arambol: 'आम्ही आमचे रक्षण करण्यास समर्थ'! हरमलवासीयांचा पोलिसांना अल्टिमेटम; राजकीय नेत्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह

Arambol Prostitution Racket: स्थानिकांनी पीडित महिलांचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची आग्रही मागणी केली आहे. या एका मागणीमुळे पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हरमल येथील राजरोसपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरुद्ध स्थानिक लोक संतप्त झाले आहेत. आम्ही आमचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, असा पवित्रा घेत स्थानिकांनी पोलिसांना सोमवारपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात प्रबळ विरोधातील एकही पक्षांच्या नेत्यांनी याबाबत स्थानिकांकडे साधी विचारणाही केली नसल्याचे माजी सरपंच डॅनियल डिसोजा यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, हे मौन आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

स्थानिकांनी पीडित महिलांचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची आग्रही मागणी केली आहे. या एका मागणीमुळे पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे. डॅनियल डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमलमध्ये स्पा सेंटर्स सुरू राहणे आणि पोलिसांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या, हा निव्वळ योगायोग नसून यामागे एखादी ''अदृश्य शक्ती'' चा हात आहे.

येत्या सोमवारपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास हरमलमध्ये जनआंदोलन करण्याची आमची तयारी आहे. हे आंदोलन केवळ पोलिसांविरुद्ध नसेल, तर त्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात असेल.

चार दिवस झाले, पण एकाही नेत्याने आमची साधी विचारपूसही केली नाही. आम्ही आता कोणाचीही वाट न पाहता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. पण, जे स्वतःला जनतेचे कैवारी म्हणतात, त्यांचे दर्शन न होणे हे खटकणारे आहे.

- जोकीम फर्नांडिस, स्थानिक

पत्रकारांना सर्व माहिती मिळते, तर पोलिसांना ती का मिळत नाही? आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, पण राजकीय पाठबळ नसल्याने कारवाई संथ आहे की काय, अशी भीती वाटते. सोमवारी आमची पुढील रणनीती ठरेल.

- डॅनियल डिसोझा, माजी सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT