सासष्टी, सध्या पावरहाउस सर्कल परिसर सुशोभित करण्याचे काम हातात घेतले आहे. तीन टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून वाहतूक बेटांचे सुशोभीकरण तिसऱ्या टप्प्यांत होईल.
या वाहतूक बेटांवर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भलेमोठे पुतळे उभारले जाणार आहेत. हे काम जीआयसीडीसी मार्फत केले जाणार आहे. पण त्याला थोडा उशीर होणार आहे, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज या परिसराची पाहणी केली. त्यांच्या समवेत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व नगरपालिकेचे अभियंते उपस्थित होते.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीने येथे तात्पुरता पुतळा उभारुन ती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. हा पुतळा केवळ तात्पुरता असेल असे त्यांना सांगण्यात आले आहे, ते त्यांना मान्य आहे असेही कामत यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे मडगावात नाहीत. ते उभारण्यासाठी मडगाव नगरपालिकेने ठराव मांडून त्यास मान्यता दिली होती, असेही कामत यांनी
सांगितले.
या पुतळ्याचे डिझाईनिंग व कुठे उभारायचे याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी जीएसआयडीसीला सांगण्यात आले आहे, असेही कामत यांनी सांगितले.
रावणफोंड रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू केले जाईल. झाडे कापण्याची संमती आलेली आहे व लगेच हे काम हातात घेतले जाईल. पुलाच्या डिझाईनलासुद्धा संमती मिळाली आहे, त्यामुळे हे काम कधीही सुरू होऊ शकते. सध्या कंत्राटदाराने लहान लहान कामे सुरू केल्याचे कामत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.