Water flowing through aqueducts Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत जलवाहिनी फुटली...

लाखो लिटर पाणी वाया: पंधरा दिवसांंपासून विभागाचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

डिचोली: एका बाजूने डिचोलीतील काही भागात पाण्याची समस्या असताना, दुसऱ्या बाजूने मात्र चक्क शहरात प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे. राज्य महामार्गाअंतर्गत येणाऱ्या बगलमार्गावर नाईकनगर-बोर्डे परिसरात मोठी जलवाहिनी फुटून प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपयव्य होतोय. ही जलवाहिनी नेमकी कधी फुटली, त्याची निश्चित माहिती मिळाली नसली तरी किमान पंधरा दिवस उलटून गेल्याची खात्रीलायक माहिती आहे.

नाईकनगर भागातील एका नागरिकाने या माहितीस दुजोरा दिला. बगलमार्गावर बांधकाम चालू असलेल्या छोट्या पुलाजवळून गेल्या महिन्यापासून पाणी वाहत आहे, असे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार या जलवाहिनीतून पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे अस्नोडा प्रकल्पात पाणी पुरवण्यात येत आहे. नाईकनगर-बोर्डे परिसरात बगलमार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळून गेलेल्या मोठ्या जलवाहिनीच्या जॉईंटमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. त्यामुळे दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीत बिघाड नेमका कसा झाला, ते समजू शकले नसले तरी पुलाचे काम करताना जलवाहिनीचा जॉईंट सुटला असावा असा अंदाज आहे.

दुरुस्ती करण्याकडे साफ दुर्लक्ष

ज्या ठिकाणी जलवाहिनीत बिघाड झाला आहे, त्या ठिकाणी सहजासहजी कोणी फिरकत नाही. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. तरीही पुलाचे कामगार, कंत्राटदार यांचा त्या ठिकाणी वावर असतो. मात्र अद्यापही या जलवाहिनीची दुरुस्ती झालेली नाही. उलट बाहेर वाहणाऱ्या पाण्यासाठी वाट करून दिल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT