Miserable condition of roads  Dainik Gomantak
गोवा

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दोन एजन्सींच्या नियुक्तीला मान्यता

Bad Road in Goa : राज्य मंत्रिमंडळाने गोव्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य मंत्रिमंडळाने गोव्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

या एजन्सी खड्डे दुरुस्त करण्यासाठी अत्याधुनिक जेट-पॅचर मशीन वापरणार आहेत. तसेच १८ महिन्यांची हमी देखील त्या घेणार आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी एक मशीन काम करणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी आज दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंर ते पत्रकारांशी बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम खाते रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक नवीन ॲप बनवणार आहे. सध्या हॉटिक्सिंग किंवा दुरुस्ती झाल्यानंर लगेच रस्ते खोदण्याच्या अनेक तक्रारी लोकांकडून आल्या आहेत.

परंतु, रस्त्याखाली अनेक गोष्टी जशा भूमिगत वीजवाहिनी, पाईप टाकले जात आहेत. या गोष्टी अगोदरच ठरलेल्या असतात, त्यासाठी एकदा हॉटमिक्सिंग किंवा दुरुस्ती झाल्यानंतर रस्ते खोदण्याचे प्रकार घडत आहेत.

नवीन ॲपद्वारे ही कामे नियोजित करण्याचा प्रयत्न खाते करणार आहे. त्यासाठी हॉटमिक्स केलेला रस्ता दोन वर्षांच्या कालावधीसाठी खोदला जाऊ नये, अशी कल्पना आहे. खोदाईचे जे काही काम करायचे असेल ते दोन वर्षानंतरच होऊ दिले जाईल.

या सर्व गोष्टींवर ॲपद्वारे नजर ठेवली जाईल. ज्यांना रस्ते खोदाईचे काम करायचे आहे, त्यांना सर्व बाबी तपासून हे ॲप आपोआप परवानगी देईल, असे काब्राल यांनी स्‍पष्ट केले.

खात्यात सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता असून याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली आहे. सध्या सहाय्यक अभियंता होण्यासाठी पात्र असलेले त्यापर्यंत पोहोचता नाही, कारण त्यांचा ताबा स्वीकारण्यासाठी कर्मचारी नाही, असे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT