rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

गोव्यासाठी अ‍ॅप आधारित टॅक्सी आवश्यक - रोहन खंवटे

अ‍ॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन गोवा सरकारमध्येच वेगवेगळ्या भूमिका

Sumit Tambekar

गेले काही दिवस गोवा राज्यात अ‍ॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन राज्य सरकारमध्येच वेगवेगळ्या भुमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. यातच आज गोवा विधानसभेच्या नवव्या दिवशी मंत्री रोहन खंवटे यांनी यामूद्यावर भाष्य केले आहे. खंवटे म्हणाले की, गोवा राज्यात अ‍ॅप आधारित टॅक्सी आवश्यक आहे. कारण यामूळे गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यंटकांना याचा फायदा होणार आहे. (APP BASED TAXI MUST FOR GOA - minister Rohan Khaunte )

तसेच पुढे बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, गोव्यात टॅक्सी सूविधेसाठी गोवा माइल्स प्रकारचे मॉडेल आवश्यक आहे. ज्याच्यामूळे टॅक्सी ऑपरेटर ग्राहकांकडून सुविधा शुल्क आकारत असताना टॅक्सी चालकांना त्यांच्या खिशातून पैसे दिले जात नाहीत. असे ते म्हणाले आहेत.

अ‍ॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या भुमिका

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अ‍ॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावर बोलताना असे म्हटले आहे की, काही ठिकाणी वाहन चालक विनामीटर टॅक्सी सेवा देत आहेत. त्यामूळे पर्यटकांकडून अधिक पैसे उकळण्यासारखे प्रकार घडू शकतात. असे निरिक्षण नोंदवले होते. तसेच मंत्री रोहन खंवटे यांनी ही अ‍ॅप आधारित टॅक्सीच्या मुद्यावरुन सर्वांचे एकमत असणे आवश्यक आहे.

असे म्हटले होते. तसेच राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी यावर बोलताना अ‍ॅप आधारित टॅक्सीला गोव्यात परवानगी देताना या प्रस्तावाचा पुन्हा एकदा विचार व्हावा असे म्हटले आहे त्यामूळे गोवा सरकर या मुद्यावरुन पुढे काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT