Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: शिवोलीत चरस बाळगल्याप्रकरणी बंगळुरूच्या तरुणाला अटक; 4.30 लाख रुपयांचा ऐवज जप्त

Charas seized in Siolim: शिवोली येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ४२९.३ ग्रॅम चरस जप्त केला असून बेंगळुरू येथील राजन सेट्टियार (वय ३२) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: शिवोली येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ४२९.३ ग्रॅम चरस जप्त केला असून बेंगळुरू येथील राजन सेट्टियार (वय ३२) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ४.३० लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बंगळुरू येथील रहिवासी राजन सेट्टियार शिवोली येथे राहत होता. राजन याला संशयित काळसर रंगाच्या चरससह रंगेहाथ पकडण्यात आले.

अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या विरोधात एन्डीपीएस कायदा १९८५ च्या कलम २० (ब) (ii) (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांनी केले.

छापेमारी करणाऱ्या पथकात पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नाईक, वेंकटेश माईंणकर, योगेश मडगावकर, तुषार परवार, देवराज नाईक आणि महिला कॉन्स्टेबल सीमा अर्पारकर यांचा समावेश होता.

या प्रकरणाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर करत असून, पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क आणि पथकाचे पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT