Anjuna Police News  Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: हणजुणे सेक्स रॅकेटप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक; परदेशी व्यक्तींचा सहभाग उघड

Anjuna Crime News: हणजुणे पोलिसांच्या पथकाकडून बंगळुरात शोध; एक संशयित फरार

गोमंतक ऑनलाईन टीम

Anjuna Police News: काही दिवसांपुर्वीच हणजुणे परिसरात गोवा पोलिसांनी एक रेस्क रॅकेट उद्धस्त करत काही परदेशी तरूणींना अटक केली होती. या प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. हणजुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये आणखी एका परदेशी व्यक्तीचा सहभाग उघड झाला आहे.

हणजुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे एक पथक बंगळूरू येथे गेले होते. पोलिस उपनिरीक्षक साहिल वारंग यांनी या पथकाचे नेतृत्व केले. ओलोकपा या नायजेरीयन व्यक्तीच्या शोधासाठी हे पथक बंगळूरूला गेले होते.

मानवी तस्करीच्या गुन्हयात तो फरार होता, पोलिसांना तो हवा आहे. हणजुणे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने दोन ठिकाणांवर शोध घेतला. पण दोन्ही ठिकाणी पोलिस पोहचण्याआधी फरार होण्यात तो यशस्वी ठरला.

दोन्ही ठिकाणी त्याला चार्ल्स आयहन (वय 32) या नायजेरीयन व्यक्तीने त्याला मदत केली होती. त्यामुळे चार्ल्स याचा मोबाईल फोन तपासला असता त्याने ओलोकपा याला पोलिसांच्या हालचालींची माहिती पुरवत होता, हे समोर आले.

त्यामुळे चार्ल्स याला अटक करण्यात आली आहे. त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई हे अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT