Premier Cricket League Dainik Gomantak
गोवा

Premier Cricket League: स्नेहल कवठणकरचे आणखी एक शतक

Premier Cricket League: प्रीमियर लीग क्रिकेट नाबाद 103 धावा, ईशान गडेकरसह शतकी भागादारी

दैनिक गोमन्तक

Premier Cricket League:

राज्याचा अनुभवी रणजी क्रिकेटपटू स्नेहल कवठणकर याने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या दिवशी पणजी जिमखान्याला साळगावकर क्रिकेट क्लबविरुद्ध 7 बाद 290 धावा करता आल्या. सामना चिखली-वास्को येथे सुरू आहे.

स्नेहलने धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध मागील सामन्यात 149 धावा केल्या होत्या. सोमवारी नाणेफेक जिंकून पणजी जिमखान्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. स्नेहलने मागील लढतीतील धडाका कायम राखताना 193 चेंडूंत 11चौकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा नोंदविल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी सलामीच्या ईशान गडेकर याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. ईशानने 154 चेंडूंत नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने 94 धावा केल्या.

पार्थ साहनीच्या पाच विकेट

पर्वरी येथील मैदानावर डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ साहनी (5-31) याच्या भेदक माऱ्यासमोर चौगुले स्पोर्टस क्लबचा पहिला डाव 186 धावांत आटोपला. नंतर पहिल्या दिवसअखेर धेंपो क्रिकेट क्लबची 2 बाद 19 धावा अशी स्थिती होती.

जीनो क्लबचे गोलंदाज प्रभावी

गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर सांगे येथील जीसीए मैदानावर जीनो स्पोर्टस क्लबने मडगाव क्रिकेट क्लबचा पहिला डाव 215 धावांत गुंडाळला. दिवसअखेर जीनो क्लबने 1 बाद 54 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

1) मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ७० षटकांत सर्वबाद २१५ (फेलिक्स आलेमाव ४७, पियुष यादव २१, समर दुभाषी ५३, दिशांक मिस्कीन १४, यश गाडिया नाबाद ३७, कौस्तुभ पिंगुळकर १९, समर्थ राणे ३-३२, मोहित रेडकर २-४९, झीशान अन्सारी ३-६०, दर्शन मिसाळ २-४४) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः २० षटकांत १ बाद ५४ (देवन चित्तेम नाबाद ३१, निसर्ग नागवेकर नाबाद १८).

2) पणजी जिमखाना, पहिला डाव ः ९० षटकांत ७ बाद २९० (ईशान गडेकर ९१, महंमद अर्स्लान खान ३२, स्नेहल कवठणकर नाबाद १०३, मनीष काकोडे नाबाद ११, सागर उदेशी ४-१०४, ईशान मुलचंदानी २-६०) विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब.

3) चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ७९.५ षटकांत सर्वबाद १८६ (रोहन कदम ६१, शंतनू नेवगी २०, रिजुल पाठक २३, कीथ पिंटो ४७, फरदीन खान नाबाद १४, शुभम तारी २-३१, पार्थ साहनी ५-३१) विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ८ षटकांत २ बाद १९.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT