Vasco Crime Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: फ्लॅट, प्लॉट देण्याच्या बहाण्याने कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्यांचे आणखी एक प्रकरण उघडकीस

फसवणूक झालेल्यांची पोलिसांत धाव, वास्कोत चार ठकसेनांविरोधात तक्रार दाखल

Akshay Nirmale

Vasco Crime: फ्लॅट, प्लॉट देण्याच्या बहाण्याने करोडो रुपयांना गंडा गाळणाऱ्यांचे आणखी एक प्रकरण वास्कोत उघडकीस आले असून त्या प्रकारची तक्रार वास्को पोलीस तालुका दाखल करण्यास फसवणूक झालेल्यांनी धाव घेतली आहे.

सात आठ महिन्यापूर्वी गरजू लोकांकडून लाखो रुपये गोळा करून फ्लॅटमध्ये विनाभाडे राहा असे सांगून गंडा घातलेल्या नूर अहमद नंतर आता अशाप्रकारचे फ्लॅट देण्याच्या बहाण्याने गंडविलेल्या लोकांनी वास्को पोलिस स्थानकात धाव घेऊन चार ठकसेना विरुध्द तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी मोठे रॅकेट असल्याचा दावा लोकांनी केला आहे. उपासनगर येथे हाऊसिंग कॉलनीत फ्लॅट देतो, तसेच प्लॅाट देतो असे सांगून कित्येक लोकांना 1 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण उघड झाले आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी वास्को पोलिस संघात धाव घेतली आहे. तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांचा धनादेश, एक लाख रुपये आगाऊ रक्कम अशी रक्कम गोळा करून करोडो रुपयांना गंडा ठकसेनांनी घातला असून आपण गंडवले गेल्याचे कळताच आज त्यांनी वास्को पोलिस स्थानकांत धाव घेऊन सदर ठकसेना विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT