Dabolim Airport Bomb Hoax:  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport Bomb Hoax: दाबोळी विमानतळावर बॉम्ब असल्याचा निनावी कॉल; पोलिस यंत्रणेची धावपळ

बिहारी युवकाने मद्याच्या अंमलाखाली केला फोन, पोलिस, अग्निशमन दल विमानतळावर झाले होते दाखल

Akshay Nirmale

Dabolim Airport: दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर बॉम्ब असल्याचा निनावी कॉल आज शनिवारी गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. या कॉलमुळे पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेची चांगलीची धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांसह अग्निशमन दलाने तातडीने विमानतळावर धाव घेत आवश्यक ती कार्यवाही सुरू केली.

पोलिसांनी श्वान पथक आणि बॉम्ब स्कॉडसह संपुर्ण विमानतळ परिसराची तपासणी केली. पण कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तसेच श्वान पथकालाही काहीही संशयास्पद आढळून आले नाही. पण, खबरदारी म्हणून पोलिसांनी विमानतळावरील सर्व जागा तपासल्या. यामुळे काही प्रवाशांना थोडा मनस्तापही सहन करावा लागला.

दरम्यान, विमानतळावर बॉम्ब असल्याचा धमकीचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तो कॉल ट्रेस करणे सुरू केले. त्यावरून पोलिसांनी एका युवकास अटक केली आहे. कुंदन कुमार असे त्याचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे.

मद्याच्या अंमलाखाली त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. सध्या पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. तथापि, या कॉलमुळे पोलिस, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. काही काळ प्रवाशांंमध्ये घबराटही पसरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT