श्री रामनवमी Dainik Gomantak
गोवा

बार्देशातील साई सेवाधामचा शुक्रवारी वर्धापनदिन

श्री रामनवमी उत्सव अशा विविध कार्यक्रमांना 8 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: काणका-बार्देश येथील श्री साई सेवाधाम विश्वस्त मंडळातर्फे श्रीसाईबाबांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा एकोणिसावा वर्धापनदिन सोहळा तसेच द्वारकमाई मंदिरातील श्रीगणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा सतरावा वर्धापनदिन व श्री रामनवमी उत्सव अशा विविध कार्यक्रमांना 8 रोजी प्रारंभ होणार आहे.

8 ते 10 एप्रिलपर्यंत दररोज पहाटे 5.15 वाजता काकड आरती, इतर धार्मिक विधी होतील. उत्सवमूर्तीस स्वहस्ते अभिषेक करण्याची सोय करण्यात आली आहे.8 रोजी सकाळी परेश पालयेकर यांच्या यजमानपदाखाली पंचायतन यागास प्रारंभ होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी 7.30 वाजता धुपारती व तीर्थप्रसाद, तर रात्री 10 वाजता शेजारती होईल.

9 रोजी वर्धापनदिनानिमित्त गृहस्थापना, मुख्य देवता हवन, बलिदान, पूर्णाहुती, सकाळी 9 वाजता यजमान वासुदेव कोरगावकर यांच्यातर्फे गणपती मंदिर अभिषेक, सकाळी 10 वाजता एकवीस दाम्पत्यांतर्फे श्री साई सत्यनारायण पूजा, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता साई पालखी मंदिर प्रदक्षिणा व महिलांतर्फे दीपोत्सव, सायंकाळी 7.30 वाजता धुपारती व तीर्थप्रसाद, रात्री 8 वाजता तेंडोली येथील श्री बावळेश्वर दशावतार नाट्यमंडळातर्फे ‘मोक्षदायिनी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग, तर रात्री 10 वाजता शेजारती होईल.

10 रोजी रामनवमीनिमित्त दुपारी 12 वाजता रामजन्म सोहळा, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी 7 वा. दहीहंडी फोडण्याचा विधी, तदनंतर साई पालखी मंदिर प्रदक्षिणा, सायंकाळी 7.30 वाजता धुपारती व तीर्थप्रसाद, रात्री 8 वाजता भजन, तर रात्री 10 वाजता शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT