राष्ट्रोळी देवस्थान Dainik Gomantak
गोवा

मयडे राष्ट्रोळी देवस्थानचा आजपासून वर्धापनदिन

मंदिरात सग्रह पंचायतन याग आणि रुद्रयाग अनुष्ठान सोहळा होणार.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: तीन माड, मयडे -बार्देश येथील श्री राष्ट्रोळी प्रमुख पंचायत देवस्थानचा अठरावा वर्धापनदिन सोहळा सोमवारी 7 मार्चपासून साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सग्रह पंचायतन याग व रुद्रयाग अनुष्ठान सोहळा होईल.

यानिमित्तचे सर्व धार्मिक विधी पुरोहित गिरिधर वाटवे यांच्या अधिपत्याखाली आणि मानकरी महाजन अंबिका सुर्लीकर व अनिता भरत आसोलकर (धुरी) यांच्या यजमानपदाखाली होणार आहेत.

सोमवारी 7 ते गुरुवारी 10 मार्च या दरम्यान दररोज सकाळी 8 वाजता श्रीगणेशपूजन, पुण्याहवचन, प्राकारशुद्धी, लघुरुद्र, अभिषेक, गृहशांती, पंचायतन याग, देवता प्रतिष्ठापना, होमहवन, बलिदान, पूर्णाहुती, आरती, मंत्रपुष्प सामुदायिक प्रार्थना, तीर्थप्रसाद व महापसाद होणार आहे. 7 रोजी संध्याकाळी 7 वाजता सुहासिनींतर्फे दीपोत्सव व त्यानंतर रात्री 8.30 वाजता ‘ब्रह्मास्त्र मोक्षप्राप्ती’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होईल.

8 रोजी सकाळी श्रींस महाभिषेक व दुपारी 4 वाजता दामिनी विठू सुर्लीकर यांच्‍या यजमानपदाखाली सत्यनारायण महापूजा होईल. रात्री 8 वाजता ‘करीन ती पूर्व’ हा नाट्यप्रयोग होईल. 9 रोजी सायंकाळी 4 वाजता मीना मधुकर बेळेकर यांच्या यजमानपदाखाली सत्यनारायण महापूजा, तर रात्री 8 वाजता ‘अक्कलशून्य’ हा नाट्यप्रयोग होईल. 10 रोजी सायंकाळी 7 वाजता देणगी कूपनांचा निकाल जाहीर केल्यानंतर आगामी पूजेच्या मानकऱ्यांची निवड होईल. रात्री 8.30 वाजता स्थानिक कलाकारांतर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT