Mapusa police arrested Accused Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police : अश्लिल फोटो पाठवून महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या म्हापशातील युवकाला अटक

महिलेला संशयिताने तिचे अश्लिल फोटो इन्स्टाग्रामवर पाठवले.

Rajat Sawant

इन्स्टाग्रामवर महिलेचे अश्लिल फोटो पाठवून तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या एका संशयित युवकाला हणजुणे पोलिसांनी अटक केली आहे. संशयित युवक हा म्हापसा येथील असून त्याला न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हणजुण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणजुण येथे राहणाऱ्या एका महिलेला संशयिताने तिचे अश्लिल फोटो इन्स्टाग्रामवर पाठवले आणि लैंगिक सुखाची मागणी केली. तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. महिलेने संशयिताविरोधात हणजुण पोलिस स्थानकात तक्रार दिली.

तक्रारीच्या आधारे एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले व संशयिताच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी संशयिताचा लॅपटॉप व मोबाईल जप्त करण्यात आला. संशयित हा तक्रारदाराचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले.

कुणाल मयेकर (21, रा. म्हापसा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याला न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे.  पुढील तपास उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलील अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी आणि पीआय प्रशाल देसाई यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT