Anjuna News Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: हणजूण ग्रामस्थांची 'गाव बंद'ची हाक! सभेस्थळी मायकल-मनोज यांच्यात शाब्दिक चकमक...

गोवा खंडपीठाने हणजूण पंचायत क्षेत्रातील किनाऱ्यावरील विकास प्रतिबंधित तसेच सीआरझेड परिसरातील बेकायदा 175 बांधकामे सील करण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमन्तक

Anjuna News

गोवा खंडपीठाने हणजूण पंचायत क्षेत्रातील किनाऱ्यावरील विकास प्रतिबंधित तसेच सीआरझेड परिसरातील बेकायदा 175 बांधकामे सील करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थानिक पंचायत व गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेला विरोध करीत आज सोमवारी (ता. 19) ग्रामस्थांनी 'हणजूण गाव बंद'ची हाक दिली.

दिवसभर गावातील व्यावसायिकांनी कामकाज बंद ठेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार मायकल लोबो व आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांच्यात सभेस्थळी शाब्दिक चकमक झाली. लोबो आणि परब यांच्यातील झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. सद्यःस्थितीला परब यांनी सरकारला दोषी धरले.

तसेच, गोव्यातील जमिनी व व्यावसायिकांना वाचवण्यासाठी सरकारने संरक्षण कायदा अंमलात का आणला नाही, असा जाब परब यांनी लोबोंनी विचारत धारेवर धरले.

मात्र, लोबोंकडे समर्पक उत्तर नव्हते. आणि परब यांनी लोबोंना घेरण्याचा प्रयत्न केला असता, इतरांनी परब यांना बाजूला केले. तसेच, राजकारण किंवा वैयक्तिक टीका करु नका, अशी समज दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT