Goa Loud Music Issue Canva
गोवा

Anjuna: हणजुणातील 8 आस्थापने बंद! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश; पब्ससह 24 ठिकाणी तपासणी

Anjuna Noise Pollution: रात्रीच्यावेळी कर्कश आवाजात ध्वनी प्रदूषण सुरूच असल्याने यावर देखरेखीसाठी आयुक्त नेमण्याची विनंती अवमान याचिकादाराने केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Noise Pollution

पणजी: हणजूण किनारपट्टी परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे रेस्टॉरंट्स व पब्स मिळून सुमारे २४ आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीवेळी ८ आस्थापनांनी ध्वनी मोजमाप यंत्रे (साऊंड मॉनिटरींग स्टेशन्स) बसवली नसल्याचे आढळून आल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणीचे निर्देश मंडळाने दिले आहेत. अजूनही रात्रीच्यावेळी कर्कश आवाजात ध्वनी प्रदूषण सुरूच असल्याने यावर देखरेखीसाठी आयुक्त नेमण्याची विनंती अवमान याचिकादाराने केली आहे. याचिकादाराच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंडळाने वेळ घेतल्याने खंडपीठाने सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सदस्य सचिव शमिला मोंतेरो तसेच अवमान याचिकादार डेस्मंड आल्वारिस यांनी खंडपीठात प्रतिज्ञापत्रे सादर केली. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी मंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्याने किती आस्थापनांनी ध्वनी मोजमाप यंत्रे बसविली आहेत याची तपासणी करण्याचे निर्देश ४ फेब्रुवारीला दिले होते.

त्यानुसार मंडळाने ७ फेब्रुवारी व ११ फेब्रुवारीला तपासणी करून त्याची माहिती दिली आहे. २४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली त्यावेळी ८ आस्थापनांमध्ये ध्वनी मोजमाप यंत्रे बसवण्यात आली नसल्याचे आढळून आले त्याविरुद्ध कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. काही आस्थापनांना आठवण करून देण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे.

गेल्या जानेवारीपासून खंडपीठाने वेळोवेळी प्रतिवाद्यांना निर्देश देऊनही मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात संगीत वाजवण्याचे प्रकार अजूनही घडत आहेत. पोलिस यंत्रणा तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत आहे. एखाद्याने याविरुद्ध तक्रार दाखल केल्यास त्याच्या घरी संबंधित आस्थापनाकडून बाऊन्सर्स घरी येतात व धमकी देतात. त्यामुळे कोणी तक्रार देण्यास पुढे येत नाही.

आयुक्त नेमावा!

खंडपीठाने आस्थापनांनी हटविलेल्या सीसी टीव्ही फूटेज मिळवण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र, त्याची काहीच माहिती दिली नाही. ध्वनी मोजमाप यंत्रे बसवली नाहीत. नव्या आस्थापनांना पोलिस व प्रदूषण नियंत्रणच्या शिफारशीनुसार उपजिल्हाधिकारी परवाने देत आहेत. ध्वनी नियंत्रण रोखण्याबाबत खात्यांत समन्वय नसल्याने हणजूण भागात गोंधळ आहे. त्यामुळे देखरेखीस आयुक्त नेमावाच लागेल, असा मुद्दा अवमान याचिकादाराने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT