Anjuna Beach |Cage Culture |Fish Farming Dainik Gomantak
गोवा

Anjuna Beach: हणजुणे समुद्रात युरोपीयन पद्धतीचे फिश केज कल्चर

हणजुणे समुद्रात युरोपीयन पद्धतीच्या फिश केज कल्चरमार्फत मत्स्य उत्पादन घेण्यात येणार असल्याची माहिती समुद्ररत्नच्या संचालिका छाया जाधव यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Anjuna Beach: राज्याला आणि देशाला लाभलेल्या किनारपट्टीचा अधिक मत्स्य उत्पादनाकरिता केंद्र सरकारच्या निळी क्रांती (ब्ल्यू रेवोल्युशन) अंतर्गत मच्छीमार खाते आणि समुद्ररत्न इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने हणजुणे समुद्रात युरोपीयन पद्धतीच्या फिश केज कल्चरमार्फत मत्स्य उत्पादन घेण्यात येणार असल्याची माहिती समुद्ररत्नच्या संचालिका छाया जाधव यांनी दिली आहे.

जाधव म्हणाल्या, आहारामध्ये मासे असणे ही सकस आहाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब आहे. देशाला आणि राज्याला मोठी किनारपट्टी लाभली असतानाही आपल्याकडे तुलनात्मकदृष्ट्या युरोपीयन देशांसारखे मत्स्य उत्पादन घेतले जात नाही.

त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसून येतो. यासाठीच राज्याच्या समुद्रात वा किनारपट्ट्यांवर युरोपीयन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मत्स्य उत्पादन घेतल्यास त्याचा फायदा रोजगार संधींबरोबर निर्यात वाढीसाठीही होणार आहे.

या तंत्रज्ञानानुसार खोल समुद्रात, धरणांमध्ये, लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पिंजरे टाकून माशांचे उत्पादन घेता येते. यासाठीच राज्य सरकारच्या मच्छीमार संस्थान खात्याच्या वतीने विविध प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच भाग म्हणून मच्छीमार खाते एनआयओ, सीएमएफआरआय आणि समुद्ररत्न संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी सर्व्हे करण्यात आले. त्यानुसार मोरजी आणि हणजुणे भागात अशा प्रकारे फिश केज कल्चर राबवता येऊ शकते, हे स्पष्ट झाले. याकरिता समुद्ररत्न संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

राज्यात सध्या इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणामध्ये मासे आयात केले जातात. मात्र, नावीन्यपूर्ण पद्धतीने मत्स्य उत्पादन केल्यास राज्यासाठी लागणारे मासे मिळतील. याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल.

यासाठी मच्छीमार सहकारी संस्था उभारणे गरजेचे असून सरकारच्या मच्छीमार खात्याच्या वतीने केले जाणारे प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहेत. - छाया जाधव, संचालक, समुद्ररत्न इनोव्हेशन

सहा महिन्यांत उत्पादन

या फिश केज कल्चरमध्ये केवळ 6 ते 8 महिन्यांमध्ये विक्रीयोग्य माशांचे उत्पादन घेता येते. सध्या ‘बासा’ हा मासा व्यावसायिक मासा म्हणून पुढे आला असून त्याला मोठी मागणी आहे. याशिवाय तिलापिया आणि चणक माशांचे उत्पादनही घेता येऊ शकते.

साधारणपणे तिलापिया मासा 6 महिन्यांत 400 ते 500 ग्रॅम वाढतो. तर बासा मासा 5 ते 8 महिन्यांमध्ये 800 ते 1500 ग्रॅम असा विक्रीयोग्य बनतो. याचे यशस्वी व्यावसायिक उत्पादन घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT