Anjuna Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Anjuna Fatal Accident: संरक्षक कठड्याला दुचाकी धडकली, रस्त्यावर कोसळलेल्या आंध्र प्रदेशच्या तरुणीला कारने चिरडले

Pramod Yadav

Anjuna Fatal Accident

गोव्यातील अपघातांचे सत्र काहीकेल्या थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (दि.11 मार्च) हणजुणेत झालेल्या दुचाकीच्या अपघातात आंध्रप्रदेश येथील तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत तरुणी पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, सकाळी स्टार्को जंक्शन येथे हा अपघात झाला.

टी पुजिथा (वय 27, रा. आंध्रप्रदेश) असे अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टी पुजिथा रेंट बाईकवरुन प्रवास करत असताना तिची दुचाकी स्टार्को जंक्शन येथे संरक्षक कठड्याला धडकली. धडक बसल्यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या पुजिथाच्या अंगावरुन भरधाव कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

कार चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात रेंट दुचाकीचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.

हरमलमध्ये वाहन अंगावरुन गेल्याने चुलतभावांचा झाला होता अंत

हरमलमध्ये वाहन अंगावरुन गेल्याने चुलतभावांचा अंत झाला होता. कारचा अचानक दरवाजा उघडल्याने दुचाकीवरुन जाणारे दोघे रस्त्यावर कोसळले. दरम्यान याचवेळी आलेले भरधाव वाहन त्यांच्या अंगावरुन गेल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.

या अपघातात साहील शंकर नाईक (वय १७ वर्षे) आणि त्याचा चुलतभाऊ दीप दिलीप नाईक (वय २१ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT